Satara Constituency : शशिकांत शिंदे यांना रिटर्न गिफ्ट देण्याची नामी संधी चालून आली : नरेंद्र पाटील

Shashikant Shinde Latest Marathi News : आमदार शशिकांत शिंदे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचा सातारा लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
mathadi kamgar leader narendra patil criticises shashikant shinde satara lok sabha election 2024
mathadi kamgar leader narendra patil criticises shashikant shinde satara lok sabha election 2024Saam Digital

Narendra Patil :

सातारा लोकसभा मतदारसंघातील (satara lok sabha constituency) तुतारीचा उमेदवार मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत घोटाळा करतो ही गाेष्ट मनाला वेदना देणारी आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीला उमेदवारी दिली जाते परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आम्ही काही बोलूच शकत नाही अशी खंत माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील (mathadi kamgar leader narendra patil) यांनी आमदार शशिकांत शिंदे (mlc shashikant shinde) यांच्यावर टीका करताना व्यक्त केली. (Maharashtra News)

नरेंद्र पाटील म्हणाले सातारा लोकसभा मतदार संघात भाजपाकडून मी इच्छुक आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याला देखील निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहाेत. माथाडी कामगारांचे प्रश्न शरद पवार यांनी सोडवले हे खर आहे मात्र देवेद्र फडणवीस यांनीही माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले आहेत असे आवर्जुन पाटील यांनी नमूद केले.

mathadi kamgar leader narendra patil criticises shashikant shinde satara lok sabha election 2024
Shirdi News: साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; भाविकांसाठी बुधवारी साई मंदिर रात्रभर राहाणार खुले

पाटील पुढं बाेलताना म्हणाले सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी मला बेंबीच्या देठापासून विरोध केला. आम्ही माथाडी परिवाराने त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्याच्या विजयाच्या दृष्टीने कामं केलं. सन 2019 ला त्यांनी आमच्या काही सहकार्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात काही कटकारस्थान लादलं त्याच रिटर्न गिफ्ट त्यांना देण्याची संधी आल्याचे पाटील यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mathadi kamgar leader narendra patil criticises shashikant shinde satara lok sabha election 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपुढं गेल्यावर बंडखाेरी करण्याचे अनेकजण टाळतात, राजेश क्षीरसागरांनी सांगितलं कारण (पाहा Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com