मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपुढं गेल्यावर बंडखाेरी करण्याचे अनेकजण टाळतात, राजेश क्षीरसागरांनी सांगितलं कारण (पाहा Video)

आवाडे यांच्या बंडखाेराची फायदा नेमका कोणाला होणार? हे पाहणे महत्वाचे आहे. शिवाय पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आपण रिंगणात आहोत असे आवाडे म्हणत असल्याने त्यांच्यामागे भाजपचा हाथ आहे का? अशी चर्चा हाेत आहे.
prakash awade meets cm eknath shinde in kolhapur hatkanangale lok sabha election 2024
prakash awade meets cm eknath shinde in kolhapur hatkanangale lok sabha election 2024saam tv

- रणजीत माजगावकर

Hatkanangale Lok Sabha Constituency :

महायुतीचे उमेदवार डॅमेज होतील असं कृत्य कोणीही महायुतीतील नेते पदाधिकारी शिवाय सहयोगी नेत्यांनी करू नये. काेल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड शमेल असेही नमूद केले.  (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेकडून धैर्यशील माने (dhairyasheel mane) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याच विरोधात आता महायुतीत असणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी रणशिंग फुंकले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महायुतीच्या उमेदवाराविरोधातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

prakash awade meets cm eknath shinde in kolhapur hatkanangale lok sabha election 2024
Madha Constituency: रामराजेंना भूमिका पटली नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, माेहिते-पाटलांच्या भेटीनंतर रघुनाथराजे लागले निवडणुकीच्या कामाला

आवाडे यांच्या बंडखाेराची फायदा नेमका कोणाला होणार? हे पाहणे महत्वाचे आहे. शिवाय पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आपण रिंगणात आहोत असे आवाडे म्हणत असल्याने त्यांच्यामागे भाजपचा हाथ आहे का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राजेश क्षीरसागर यांनी प्रकाश आवाडे यांच्या बंडखाेरी विषयी मुख्यमंत्र्यांच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही. समज-गैरसमजातून प्रकाश आवाडे यांनी उमेदवारीची घोषणा केली असेल. मुख्यमंत्र्यांच्या समोर गेल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी काय केले हे आठवते. त्यामुळे त्यांच्या समाेर गेल्यावर कोणाच्याही डोक्यात बंडखोरी करण्याचा विषय असेल तर तो निघून जाताे असा विश्वास क्षीरसागर यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

prakash awade meets cm eknath shinde in kolhapur hatkanangale lok sabha election 2024
Amravati : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अमरावती शहरात उद्या वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काेल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांच्या भेटीला अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे आले आहेत. हातकणंगले लोकसभा निवडणुकी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आवाडे यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

prakash awade meets cm eknath shinde in kolhapur hatkanangale lok sabha election 2024
Dhule Accident News : बाभळे फाटानजीक मालवाहू वाहनास अपघात, 15 वर्षाची मुलगी ठार; 25 जण जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com