Dhule Accident News : बाभळे फाटानजीक मालवाहू वाहनास अपघात, 15 वर्षाची मुलगी ठार; 25 जण जखमी

mumbai agra national highway : या वाहनातील सर्व प्रवासी हे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे.
tyre brust at mumbai agra national highway 1 died 20 injured near dhule
tyre brust at mumbai agra national highway 1 died 20 injured near dhulesaam tv

- भूषण अहिरे

Dhule :

मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील बाभळे फाटा येथे मालवाहू वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत पंधरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. या अपघातात वीस ते पंचवीस मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी - मुंबईकडून मध्यप्रदेशकडे जात असताना मालवाहू वाहनाचा शिरपूर तालुक्यातील बाभळे फाटा येथे अपघात झाला. या वाहनातील सर्व प्रवासी हे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

tyre brust at mumbai agra national highway 1 died 20 injured near dhule
Dharashiv News : परंड्यात नऊ दिवसापासून पाणीबाणी, नागरिकांचा पालिका कर्मचाऱ्यांना घेराव; मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार

या दुर्घटनेत एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे पंचवीस मजूर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे. यामधील सहा ते सात मजूरांची प्रकृती गंभीर बनली आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

tyre brust at mumbai agra national highway 1 died 20 injured near dhule
Hatkanangale Constituency: हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढतीची शक्यता, माेदींना पंतप्रधान पाहण्यासाठी अपक्ष आमदार निवडणुकीच्या रिंगणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com