Dharashiv News : परंड्यात नऊ दिवसापासून पाणीबाणी, नागरिकांचा पालिका कर्मचाऱ्यांना घेराव; मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार

परंडा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर सीना कोळेगाव धरण असून देखील नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे परंडा शहराला तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
water scarcity in paranda dharashiv
water scarcity in paranda dharashiv Saam Digital

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

परंडा शहरात मागील 9 दिवसांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पालिकेवर आंदाेलन छेडले. आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरवासीयांनी पालिकेस दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंडा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर सीना कोळेगाव धरण असून देखील नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे परंडा शहराला तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. नगरपालिकेला वारंवार सांगून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने परंडा शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. (Maharashtra News)

water scarcity in paranda dharashiv
Amravati : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अमरावती शहरात उद्या वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्या दालना समाेर आंदाेलन केले. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी नागरिक गेले. परंतु मुख्याधिकारी उपलब्ध झाले नाहीत तसेच त्यांनी फोन बंद करून ठेवला त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी गांधीगिरी आंदोलन करत मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घातला. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरवासीयांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

water scarcity in paranda dharashiv
Satara Constituency : चर्चा तर हाेणारच! बारामतीच्या चव्हाणांचा सातारा लाेकसभा मतदारसंघात अर्ज दाखल, बिचुकलेंनी ठाेकला शड्डू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com