Madha Constituency: रामराजेंना भूमिका पटली नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, माेहिते-पाटलांच्या भेटीनंतर रघुनाथराजे लागले निवडणुकीच्या कामाला

Dhairyasheel Mohite Patil Birthday : माढा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज (शनिवार) वाढदिवस आहे.
raghunathraje naik nimbalkar supports dhairyasheel mohite patil in madha constituency
raghunathraje naik nimbalkar supports dhairyasheel mohite patil in madha constituencysaam tv
Published On

Madha Lok Sabha Constituency :

माढ्यातील महायुती अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपच्या विरोधात नाही पण भाजपने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात आहाेत. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही रघुनाथराजेंनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज (शनिवार) वाढदिवस आहे. या निमित्ताने तालुक्यातील कार्यकर्त्यांनी माेहिते पाटील यांना तुतारी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

raghunathraje naik nimbalkar supports dhairyasheel mohite patil in madha constituency
Satara Constituency : चर्चा तर हाेणारच! बारामतीच्या चव्हाणांचा सातारा लाेकसभा मतदारसंघात अर्ज दाखल, बिचुकलेंनी ठाेकला शड्डू

धैर्यशील मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अकलूज येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधु रघुनाथराजे निंबाळकर यांनी आज अकलूज येथे धैर्यशिल माेहिते पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर दाेघांमध्ये सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा देखील झाली.

या भेटीनंतर रघुनाथराजे निंबाळकर म्हणाले आम्ही गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आहाेत. भाजपने कोणताही नेता अगदी पियुष गोयल, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांना माढ्यातून उमेदवारी दिली असती तर त्यांना निवडून दिले असते.

आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात काम करणार असल्याचे रघुनाथराजेंनी स्पष्ट केले. रामराजे यांना माझी भूमिका पटली नाही तर आपण राजकारणापासून संन्यास घेऊ असंही रघुनाथराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

raghunathraje naik nimbalkar supports dhairyasheel mohite patil in madha constituency
Parbhani Constituency: इफ्तार पार्टीला महादेव जानकर गेले नाहीत, महायुतीमधील एक गटाची ओढवली नाराजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com