- सचिन जाधव
माढा लाेकसभा मतदारसंघात (madha lok sabha constituency) महायुतीने (mahayuti) उमेदवार बदलावा अशी मागणी आज (बुधवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याकडे केली. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत माढा मतदारसंघात आमची प्रचार करण्याची मानसिकता नसल्याचे पवार यांना स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना (ranjitsinh naik nimbalkar) यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही असे चित्र आज अजित पवार यांच्या बैठकीत दिसून आले.
या बैठकीत आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी, अजित दादा तुमच्यासमोर आलाे आहे असे कार्यकर्त्यांनी नमूद केले. भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावे. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमाने काम करू आणि त्यांना खासदार बनवू असेही कार्यकर्त्यांनी ठणकावून अजित पवार यांना सांगितले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सातारा लोकसभा मतदारसंघात नितीन पाटील हवेत
साताऱ्यात सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. या बैठकीस आमदार रामराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील उपस्थितीत हाेते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.