Swati Maliwal Assault Case Saam Tv
लोकसभा २०२४

Arvind Kejriwal: स्वाती मालीवाल प्रकरण, अरविंद केजरीवालांच्या घरी पोहचली दिल्ली पोलिस; CCTVचा डीव्हीआर घेतला ताब्यात

Swati Maliwal Assault Case: दिल्ली पोलिसांनी आज अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे.

Priya More

आम आदमी पार्टीच्या (Aam Aadami Party) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना झालेल्या मारहाण प्रकरणावरून दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणात दिल्ली पोलिस (Delhi Police) एकएक पाऊले उचलत आहेत. अशामध्ये दिल्ली पोलिसांनी आज अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि प्राणघातक हल्ल्याचा आरोप असलेले माजी पीए बिभव कुमार यांच्या अटकेनंतर आप रस्त्यावर उतरली आहे. अरविंद केजरीवाल स्वतः भाजपच्या मुख्यालयात निदर्शने करण्यासाठी बाहेर आले. पण दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले. अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, भाजपला आपचा नाश करायचा आहे आणि त्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरातून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसवर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. तेथील फुटेज कसे मिळवायचे? पोलिसांनी कालही फुटेज घेतले आणि आज डीव्हीआरसह पोलिसांनी आतील सीसीटीव्ही फुटेज घेतले. या संपूर्ण प्रकरणाचे नेतृत्व करणारे एसएचओ सिव्हिल लाइन्ससह अतिरिक्त डीसीपी केजरीवाल यांच्या घरी आले होते.

या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढत आहे. आरोपी बिभव कुमारने मुंबईत त्याचा फोन फॉरमॅट केला होता. त्यामुळे दिल्ली पोलीस बिभवला मुंबईतही घेऊन जाऊ शकतात. घटनेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काय घडले? हे समजून घेण्यासाठी पोलिसही गुन्ह्याची जागा पुन्हा तयार करू शकतात. दरम्यान, स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएने मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पीएम विभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास सर्व बाजूने करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT