Singapore Coronavirus Cases : कोरोनाचा पुन्हा कहर; रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे

Coronavirus : गेल्या कोरोना महामारीतून जग सावरत नाही तोच पुन्हा धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर पहायला मिळतोय. गेल्या सात दिवसात २५९०० कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Singapore Coronavirus Cases
Singapore Coronavirus CasesSaam Digital

गेल्या कोरोना महामारीतून जग सावरत नाही तोच पुन्हा धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर पहायला मिळतोय. गेल्या सात दिवसात २५९०० कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली असून सिंगापूर सरकारने मास्क सक्तीचे आदेशही दिले आहेत. दरम्यान हा कोरोनाचा पहिला टप्पा असल्याची माहिती सिंगापूरच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरच्या जनेतला सध्या नव्या कोरोनाच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. 5 ते 11 मे या सात दिवसातचं सक्रिय रुग्णांची 25,900 पर्यंत पोहोचली आहे. रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सिंगापूरचे आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी देशात मास्क सक्ती लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 13,700 होती. मात्र काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, एका आठवड्यात 25 हजार 900 रुग्णांची नोंद झाली आहे.

Singapore Coronavirus Cases
IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com