Kidney fungal infection symptoms saam tv
लाईफस्टाईल

Kidney fungal infection symptoms: तुमच्या किडनीलाही होऊ शकतं फंगल इन्फेक्शन; शरीरात होणारे 'हे' बदल वेळीच ओळखा

Kidney Infection: विषारी पदार्थ जमा होऊ शकतात, ज्यामुळे मळमळ आणि उलटी येण्याचा त्रास होऊ शकतो. भूक न लागणे किंवा अशक्तपणा जाणवणे ही देखील सोबतची लक्षणे असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये किडनी फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त

  • डायबेटीस असणाऱ्यांमध्ये किडनी फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वाधिक

  • लक्षणांमध्ये जळजळीत लघवी, पाठीच्या वेदना, उलटी आणि ताप यांचा समावेश

  • उपचार लवकर सुरू केल्यास बरे होण्याची शक्यता

  • स्वच्छता, वैद्यकीय सल्ला हाच बचावाचा उत्तम मार्ग

किडनी फंगल इन्फेक्शन ही एक दुर्मिळ पण गंभीर अशी समस्या आहे. जी विशेषतः अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. ही इन्फेक्शन सामान्यतः निरोगी लोकांना होत नाही. मात्र ज्या व्यक्तींना मधुमेहाचा धोका आहे त्यांना हा त्रास होऊ शकतो.

याशिवाय कॅन्सर, एड्स किंवा नुकतंच व्हायरल इन्फेक्शन झालं असेल अशांना देखील याचा त्रास होण्याची शक्यता आहे.

काय आहेत याची कारणं?

तज्ज्ञांच्या मतानुसार, मधुमेह हे किडनी फंगल इन्फेक्शनचं सर्वात सामान्य कारण आहे. उच्च साखरेची पातळी आणि कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे बुरशी (फंगस) वाढण्यास योग्य वातावरण तयार होतं. कोरोनानंतर नंतर अनेक रुग्णांमध्ये किडनी फंगल इन्फेक्शन आणि ब्लॅक फंगसची लक्षणं दिसली होती. याचे मुख्य कारण म्हणजे व्हायरसमुळे शरीराची संरक्षणशक्ती कमकुवत होणं.

याची लक्षणं काय दिसून येतात?

किडनी फंगल इन्फेक्शनची लक्षणं सौम्य ते गंभीर स्वरूपाची असू शकतात. यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो-

  • लघवी करताना जळजळ किंवा वेदना

  • वारंवार लघवी लागणं

  • पाठीच्या मानेखालचा भाग दुखणं

  • उलटी होणं किंवा मळमळ

  • सतत ताप येणं

डॉक्टर सांगतात की, अती गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या भागातील त्वचा कठीण होणं, काळसर दिसणं आणि खालावलेला रक्तदाब ही लक्षणं असू शकतात. काहीवेळा रुग्णाला आयसीयूमध्ये भर्ती करण्याची वेळ देखील येऊ शकते.

यावर कशा पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फंगल अँटीबायोटिक्स म्हणजेच बुरशीवर परिणाम करणारी औषधं ही या समस्येवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहेत. योग्य वेळी औषधोपचार केल्यास किडनी फंगल इन्फेक्शनमधून रुग्ण पूर्णपणे बरा होतो. ही इन्फेक्शन दीर्घकालीन त्रास देत नाही.

काय उपाय केले पाहिजेत?

  • विशेषतः ज्या लोकांना आधीपासून काही गंभीर आजार आहेत त्यांनी खालील गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे.

  • दमट, धुळीचे किंवा अस्वच्छ वातावरण टाळा.

  • मधुमेह, एड्स, कर्करोग यासारखे आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांनी दिलेले औषधं नियमित घ्यावीत.

  • कोणतीही लक्षणं दिसल्यास वेळ वाया घालवू नका, लक्षणं गंभीर होण्यापूर्वी उपचार सुरू करा.

किडनी फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?

ही किडनीमध्ये होणारी बुरशीजन्य इन्फेक्शन असून, ती रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेल्या व्यक्तींमध्ये होते.

कशामुळे हे इन्फेक्शन होतं?

मधुमेह, एड्स, कॅन्सर किंवा व्हायरल आजारांनंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने फंगस वाढतो आणि किडनीवर परिणाम होतो.

कोणती लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे?

जळजळीत लघवी, वारंवार लघवी लागणे, पाठीचा वेदना, उलटी आणि ताप ही मुख्य लक्षणं आहेत.

हे इन्फेक्शन बरी होऊ शकतं का?

होय, योग्य वेळी उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि दीर्घकालीन त्रास होत नाही.

कशी काळजी घ्यावी?

स्वच्छता राखा, डॉक्टरांनी दिलेले औषधं वेळेवर घ्या आणि कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT