Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : तुमची मुलं सतत वाद घालतात? पालक म्हणून कसे वागावे, जाणून घ्या

Children Mental Health : आजकाल पालकांची तक्रार असते की, मुलं सतत वाद घालतात आणि उद्धटपणे वागतात. यावर रामबाण उपाय काय? जाणून घ्या. मुलं तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतील आणि तुमचा आदर करतील.

Shreya Maskar

लहान वयातच पालकांनी मुलांवर चांगले संस्कार केले तर मुलांच व्यक्तिमत्त्वाचा उत्तम विकास होतो. त्यामुळे पालकांनी जबाबदारीने मुलांशी संवाद साधावा. अनेक वेळा मुलं पालकांशी वाद घालतात आणि पालक त्यामुळे मुलांवर रागावतात. पण असचं जर पालकांच सतत वागण राहीलतर मुलं अजून आक्रमक होतील आणि वाद घालू लागतील. चला तर मग आज जाणून घेऊयात पालक म्हणून तुम्ही मुलांशी कसे वागावे.

मुलांना योग्य वळण लावण्याचे आणि त्यांचे चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालकांनी नेहमी मुलांशी प्रेमाने वागावे. त्यांना न ओरडता समजून सांगावे.

पालकांनी मुलांचे बोलणे ऐकून घ्या

अनेक वेळा पालकांचे वागणं मुलांच्या सतत वाद घालण्याच्या सवयीसाठी कारणीभूत असतं. पालक स्वतः मुलांसमोर अनेकदा वाद घालून आपली गोष्टी मांडत असतात. मुलं देखील तुमच्या कडून हे शिकून तसचं वागू लागतात. तसेच मुलांना भांडताना पाहून पालक मुलांवर स्वतः देखील ओरडून रागवतात. जे की चुकीचे आहे. पालकांनी मुलांना नीट समजावून सांगितले पाहिजे. पालकांच्या रागवण्यामुळे एक तर मुलं जास्त उद्धट होऊ लागतात. नाहीतर ते पालकांना घाबरू लागतात. पालकांनी मुलांच्या मतांचा आदर करावा.

चूक- बरोबर याची समज शिकवा

पालकांनी मुलांना चूक- बरोबर यातील फरक समजून सांगावा. मुलांची वाद घालण्याची वाईट सवय बोलून सोडवा. मुलांना पालकांशी मनमोकळे होऊन बोलता येईल अस वातावरण निमार्ण करा. वाद घातल्यावर मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात हे मुलांना सांगा. वाद न घालता आपले मत कसे मांडावे किंवा आपली बाजू कशी पटकून द्यावी हे समजवा. मुलांशी गोड बोलून त्यांना प्रेमाने समजवा.

मुलांशी प्रेमाने वागा

आपल्या मुलांना नीट वळण लावण्यासाठी प्रेमाने वागणे हाच रामबाण उपाय आहे. त्यामुळे मुलांची चूक झाल्यास पालकांनी न ओरडता, मुलांना सांभाळून घेऊन त्यांची चूक दाखवावी. मुलांना प्रेमाने गोड बोलून त्यांच काय चुकत आहे आणि त्या चुकीचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे समजून सांगा.

मुलांसोबत जास्त कठोर होऊ नये

पालकांनी मुलांसोबत जास्त कठोर होऊ नये. त्यामुळे मुलं तुम्हाला घाबरू लागतील आणि कालांतराने तुमच्याशी गोष्टी लपवतील. मुल वाद घालतात , म्हणून तुम्ही वाद घालू नये. यामुळे मुलं अजून हट्टी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वीच दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT