Chanakya Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti - Life Lesson: जीभेवर साखर ठेवल्यास, नोकरी-धंद्यात मिळेल पैसाच पैसा ! फक्त या 6 गोष्टी लक्षात ठेवा...

Life Lesson : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यश हवे असते. पण अनेक वेळा मेहनत करूनही त्याला यश येत नाही.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti for Successful Life: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यश हवे असते. पण अनेक वेळा मेहनत करूनही त्याला यश येत नाही. नीतीशास्त्राचे महान जाणकार चाणक्य यांनी चाणक्य नीती ग्रंथात अशा 6 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या लक्षात ठेवल्यास आपल्याला आयुष्यात यश नक्कीच मिळेल.

चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात चाणक्याने यशाच्या या धोरणांबद्दल सांगितले आहे. चला जाणून घेऊया या धोरणांबद्दल...

कोणती वेळ योग्य ? खरा मित्र कोणता ?

1. चाणक्य सांगतात की, ज्यांना आपल्या आयुष्यात (Life) सध्या काय चालले आहे, काळ कसा आहे, दिवस सुखाचे आहेत की दुःखाचे आहे याची जाणीव असलेले लोक बुद्धिमान आणि यशस्वी होतात. कारण ते वेळ आणि परिस्थितीनुसार वागतात. तर दुसरीकडे ज्याला या गोष्टींची माहिती नसते त्याला त्रासाला सामोरे जावे लागते.

2. माणसाला त्याच्या खऱ्या मित्राची (Friend) माहिती असावी. जर एखाद्या व्यक्तीने मित्रांच्या रूपात उपस्थित असलेल्या शत्रूंना ओळखले नाही तर तो जीवनात नेहमीच अपयशी ठरतो. कारण त्याचा शत्रू त्याच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करतो.

3. व्यक्तीला त्याच्या कामाचे ठिकाण आणि राहण्याच्या परिस्थितीची माहिती असावी. आजूबाजूला कोणती माणसे आहेत आणि कोणते लोक काम करत आहेत याची जाणीव ठेवली तर फसवणूक होत नाही आणि कामात यश (Success) मिळते.

4. ज्ञानी तोच असतो जो आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब ठेवतो. जर एखाद्या व्यक्तीने आपले उत्पन्न न पाहता बेहिशेबी खर्च केले तर तो काही दिवसातच अडचणीत येतो.

5. कोणत्याही संस्थेत काम करताना मालकाचे किंवा बॉसचे हित जपले पाहिजे. जर तुमचे काम बॉसच्या नजरेत योग्य असेल तर तुम्ही यशाच्या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकता आणि नफा मिळण्याची शक्यताही वाढते. आपण कोणत्याही संस्थेत काम करत असलो तर त्याच्या हितासाठी निस्वार्थपणे काम केले पाहिजे.

6. माणसाला त्याच्या क्षमतांची जाणीव असली पाहिजे, तो काय आणि किती प्रमाणात करू शकतो. काम नेहमी आपल्या क्षमतेनुसार केले पाहिजे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने नेहमीच नुकसान होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

SCROLL FOR NEXT