Chanakya Niti On Saving Money : श्रीमंत बनायचे आहे पण पैसा हातात टिकत नाही? चाणक्यांच्या या 6 गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Thoughts : आचार्य चाणक्य यांनी पैसा आणि लक्ष्मी संदर्भात अनेक धोरणे सांगितली आहेत.
Chanakya Niti On Saving Money
Chanakya Niti On Saving MoneySaam Tv
Published On

How To Save Money : अनेकांना श्रीमंत व्हायची इच्छा असते. परंतु, आपल्या सततच्या चुकांमुळे लक्ष्मी देवी आपल्यावर नाराज राहाते. आचार्य चाणक्य यांनी पैसा आणि लक्ष्मी संदर्भात अनेक धोरणे सांगितली आहेत.

ते सांगतात की माणूस दीर्घकाळ संपत्ती (Wealth) कशी जमा करू शकतो. सध्याच्या काळात सुखी जीवनासाठी पैसा (Money) खूप महत्त्वाचा आहे, अशा स्थितीत चाणक्याची ही धोरणे महत्त्वाची ठरतात. चला जाणून घेऊया या धोरणांबद्दल.

Chanakya Niti On Saving Money
Chanakya Niti Mantra On Saving Money: चाणक्यांनी दिला धनवान होण्याचा मंत्र, पैशांच पाकीट कधीच होणार नाही खाली...

1. पैसे कमवणे आणि पैसे वाचवणे या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पण पैसे कमवण्यापेक्षा पैसे वाचवणे महत्त्वाचे आहे. संपत्ती जमवण्याच्या कलेत पारंगत असलेली व्यक्ती भविष्यात कधीही पराभूत होत नाही आणि कठीण काळातही सामान्य जीवन जगते. याउलट जो माणूस बेहिशेबीपणे पैसा खर्च करतो त्याला बुद्धीहीन म्हणतात. अशी व्यक्ती अडचणीच्या वेळी हात झटकत राहते.

2. पैसा मिळवण्यासाठी जोखीम पत्करावी लागते आणि जीवनात (Life) आव्हानांना सामोरे जाणारी व्यक्ती नेहमीच यशस्वी होते. म्हणूनच धोका पत्करावा, घाबरू नका. व्यवसाय कोणताही असो, यशात जोखमीची भूमिका अधिक असते.

Chanakya Niti On Saving Money
Chanakya Niti On Saving Money : कमावलेला पैसा हातात टिकत नाहीये ? चाणक्यांची ही रणनिती नेहमी लक्षात ठेवा !

3. लक्ष्मी चंचल मानली जाते. म्हणूनच पैसा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापरला पाहिजे. ते साधन म्हणून वापरले पाहिजे. कारण जो माणूस चुकीच्या कामासाठी किंवा फसवणुकीसाठी पैसा खर्च करतो तो कालांतराने नष्ट होतो.

4. चाणक्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला पैशासाठी अधर्माचा मार्ग स्वीकारावा लागतो किंवा पैशासाठी शत्रूशी हातमिळवणी करावी लागत असेल, त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते, तर अशा पैशापासून दूर राहणे चांगले.

Chanakya Niti On Saving Money
Indian Marriage Rituals : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?

5. पैसे मिळवण्यासाठी व्यक्तीला टार्गेट माहित असणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित केले नाही तर त्याला यश मिळू शकत नाही. चाणक्य यांच्यानुसार पैशाशी संबंधित कामाची माहिती इतर कोणालाही देऊ नये. तुमच्या गुप्त गोष्टी सांगितल्याने तुमचे काम बिघडण्याची शक्यता वाढते.

6. पैशांची बचत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवणे. चाणक्याच्या मते ज्याप्रमाणे भांड्यातील पाणी ठेवल्यानंतर खराब होते, त्याचप्रमाणे जर जमा झालेला पैसा वापरला नाही तर काही काळानंतर त्याचे काही मूल्य नसते. म्हणूनच पैशाचा वापर जमा करणे, दान आणि व्यवसायात गुंतवणूक म्हणून केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com