Vastu Shastra saam tv
लाईफस्टाईल

Vastu Shastra: दररोज नकळत तुमच्याकडून होतायत या 4 चुका; घरात येते नकारात्मकता, वास्तुशास्त्राचे नियम वाचा

Negative energy: वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार रोजच्या काही सवयी घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम करू शकतात, अशी मान्यता आहे. सकाळी उशिरा उठणे, दुसऱ्यांचे कपडे घालणे, नखं चावणे आणि अंथरुणावर बसून जेवणे या चार सवयी का टाळाव्यात, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकदा आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं कारण आपण ग्रहांची स्थिती किंवा खराब वेळेला मानतो. पण आपल्या रोजच्या काही सवयींचाही आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, असं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.

आपल्या नकळत होणाऱ्या काही छोट्या चुका घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम करू शकतात. यामुळे कामात अडथळे येणं, आत्मविश्वास कमी होणं अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे रोजच्या जीवनातील कोणत्या सवयी टाळायला हव्यात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळी उशिरा उठण्याची सवय टाळा

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला ऊर्जा, आरोग्य आणि मान-सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. पण सकाळी उशिरापर्यंत झोपल्यामुळे आपल्याला सकाळच्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा फायदा मिळत नाही. यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते, अशी मान्यता आहे.

दुसऱ्यांचे कपडे घालण्याची सवय सोडा

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ऊर्जा असते आणि तिचा परिणाम कपड्यांवरही होतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे वारंवार दुसऱ्या व्यक्तीचे कपडे घालणं शुभ मानलं जात नाही. यामुळे मन अस्वस्थ होणं, चिडचिड वाढणं आणि नकारात्मक विचार येणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. रोज वापरले जाणारे कपडे एकमेकांचे वापरणं टाळावं.

नखं चावण्याची सवय

अनेकांना दातांनी नखं चावण्याची सवय असते. पण ही सवय केवळ वाईट नसून मानसिक अस्वस्थतेचं लक्षणही मानली जातं. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, नखं चावण्याच्या सवयीमुळे एकाग्रता कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे वारंवार चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते.

अंथरुणावर बसून जेवण करू नका

अंथरुणाचा वापर प्रामुख्याने विश्रांती आणि झोपण्यासाठी करावा, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. त्यामुळे बिछान्यावर बसून जेवण करणं शुभ मानलं जात नाही. या सवयीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक ताण किंवा मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे नेहमी स्वच्छ जागी, शांत मनाने आणि योग्य दिशेला तोंड करून बसून जेवण करावं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pension Rules : सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी मिळाली, तर पूर्ण पगार अन् पेन्शन किती मिळणार? न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: राणा जगजित सिंह पाटील शरद पवार यांना भेटायला ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

Sleeping After Heart Attack: डाव्या की उजव्या? हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर कोणत्या कुशीवर झोपणं ठरेल फायदेशीर?

महाराष्ट्रासाठी खूशखबर! मुंबई-बंगळुरूनंतर आणखी एक स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार, कोणत्या शहराला होणार फायदा?

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन; हृदयाच्या गंभीर आजारासोबतची झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT