Health Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Health Tips : तुम्हाला सकाळी उठल्यावर लगेच भूक लागते का? असू शकतो मधुमेहाचा धोका

Diabetes Care : रात्री पोटभर जेवण करून सुद्धा तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या भूक लागत असेल तर तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Shreya Maskar

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे आपल्या आहारावर, व्यायामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रोजच्या जीवनातील आपल्याला सामान्य वाटणाऱ्या गोष्टी पुढे जाऊन मोठ्या आजारात रूपांतर होतात. त्यामुळे वेळेत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

अनेक वेळा रात्री पोटभर जेवल्यावरही सकाळी उठल्या उठल्या आपल्याला भूक लागते. ही समस्या सामान्य जरी असली तरी आरोग्यावर तिचे वाईट परिणाम होतात. चला तर मग जाणून घेऊयात. रात्री जेवूनही सकाळी भूक का लागते? वाचा सविस्तर कारणे आणि उपाय

सकाळी भूक का लागते?

  • शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास तसेच हार्मोन्सच्या असंतुलनामुळे रात्री पोटभर जेवण करून सुद्धा तुम्हाला सकाळी भूक लागते. यामुळे सकाळी अशक्तपणा आणि थकल्यासारखे वाटते.

  • रात्री अन्न खाल्ल्यावर आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते पण जसजसे अन्न पचायला लागते शरीरातील साखरेची पातळी कमी होते त्यामुळे सकाळी भूक लागते.

  • रात्रीच्या जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी कमी होते. ज्यामुळे सकाळी तहान आणि भूक लागते.

अशी घ्या काळजी

  • रोज रात्री लवकर जेवण करा.

  • कधीही जेवल्यावर लगेच झोपू नये. २० ते २५ मिनिटे चालावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होती.

  • जेवल्यावर नेहमी एक ते दोन तासाने झोपावे.

  • सकाळी भूक लागल्यास सर्वप्रथम २ ग्लास पाणी प्यावे.

मधुमेहाचा धोका

नियमित सकाळी उठल्यावर भूक लागत असेल तर तुम्हाला मधुमेहाचा धोका असू शकतो. त्यामुळे रात्री जेवताना हलका आहार घ्यावा. जेवणात भरपूर कार्बोहाइड्रेट, प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. अशा लोकांनी झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिऊ नये. कारण त्यातील कॅफिनचे प्रमाण आरोग्यास धोकादायक असते.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

SCROLL FOR NEXT