Oil Free Recipes : सकाळी तेलकट नाश्ता नको; मग ही ऑईल फ्री रेसिपी नक्की ट्राय करा

Healthy Recipes : अनेक व्यक्तींना ऑईल फ्री फूड म्हणजे तेलाचा अजिबात वापर न करता जेवण बनवायचं कसं हेच माहिती नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी आम्ही काही रेसिपी आणल्या आहेत.
Healthy Recipes
Oil Free RecipesSaam TV

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक व्यक्तींना फास्ट फूड खावं लागतं. फास्ट फूड खाल्ल्यानं अनेकांना वजन वाढण्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत. वजन वाढल्याने आता अनेक जण स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत आहेत. तसेच हेल्दी आणि ऑईल फ्री फूड खाणे पसंत करत आहेत.

Healthy Recipes
Eating Food With Hands : चमचा-काट्याने नाही, हाताने जेवणं चांगलं; होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

तुम्ही देखील डायेट करण्यास सुरुवात केली असेल तर ऑईल फ्री फूड खाणे सर्वात उत्तम. त्याने वजन देखील झपाट्याने कमी होण्यास मदत होते. अशात अनेक व्यक्तींना ऑईल फ्री फूड म्हणजे तेलाचा अजिबात वापर न करता जेवण बनवायचं कसं हेच माहिती नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी आम्ही काही रेसिपी आणल्या आहेत.

विविध फळांचा ज्यूस

ऑईल फ्री फूड बद्दल बोलताना यामधे फळे पहिल्या प्रमांकावर येतात. त्यामुळे तुम्ही नाश्त्याला दिवसाची सुरुवात करताना फळांचे सेवन करू शकता. तसेच ऑईल फ्री फळांचा ज्यूस देखील पिऊ शकता.

रवा इडली

तुमच्या आवडीच्या काही भाज्या बारीक कट करून घ्या. त्यामध्ये रवा आणि दही मिक्स करा. त्यानंतर थोडा इनो टाकून या बॅटरपासून मस्त ऑईल फ्री इडली बनवून घ्या.

ओट्स

घरी ओट्सचे एक पाकीट आणून ठेवा. नाश्त्याला ओट्स गरम दुधात मिक्स करा. तुमच्या आवडीनुसार यात साखर मिक्स करा. तसेच अन्य आवडीच्या भाज्या मिक्स करा आणि तयार झाला ओट्स नाश्ता.

चणा मसाला

बारीक व्हायचं आहे आणि तुम्ही डायेट करत असाल तर चणा मसाला हा नाश्ता सुद्धा बेस्ट आहे. त्यासाठी चणे रात्री पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी एका पॅनमध्ये जिरे मोहरी तिखट, हळद आणि चाट मसाला टाकून चणे त्यात परतून घ्या.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही

Healthy Recipes
'Fast X' Box Office Collection: 'फास्ट अँड फ्युरियस 10'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; तीन दिवसात केली कोट्यवधींची कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com