ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुंदर त्वचा सर्वांनाच हवी असते. त्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो.
ऑलिव्ह ऑईलमध्ये हळद आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला जर मुरुमांची समस्या असेल तर दूर होईल.
ऑलिव्ह ऑईल रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्यावर लावल्यास डाग कमी होण्यास मदत होते.
त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा मध आणि अंड्यामधील पिवळा भाग मिक्स करून फेस फॅक लावा.
तुम्हाला जर टॅनिंगची समस्या असेल तर ऑलिव्ह ऑईल आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास समस्या दूर होऊ शकते.
लिव्ह ऑईल नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे ज्यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.