Wrinkles Remedies, Skin Care Tips Saam tv
लाईफस्टाईल

Wrinkles Remedies : सुरकुत्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतील ही ३ पाने, असा करा चेहऱ्यासाठी वापर

Skin Care Tips : वाढत्या वयात चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहावे असे प्रत्येकाला वाटते. कोणत्याही ऋतूत त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात.

कोमल दामुद्रे

Wrinkles Home Remedies :

वाढत्या वयात चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहावे असे प्रत्येकाला वाटते. कोणत्याही ऋतूत त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात.

याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर (Skin) दिसून येतो. जसं जसे आपले वय वाढते तसं तसे आपल्या त्वचेत बदल दिसून येतात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. परंतु, हल्ली अगदी कमी वयात त्वचेचवर सुरकुत्या पाहायला मिळत आहे. त्वचेची काळजी न घेणे, अस्वच्छ आहार आणि जीवनशैली, प्रदूषण अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत ठरु शकतात. जर तुमच्याही चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील तर हा घरगुती उपाय (Home Remedies) करुन पहा.

1. कडुलिंबाची पाने

कडुलिंबाची पाने त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. या पानांपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होण्यास मदत होते. तसेच सुरकुत्या दूर होऊन रंग उजळतो.

असा करा वापर

  • हा फेसपॅक बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने घ्या.

  • पाने बारीक वाटून त्यात दही घाला. नंतर हा पॅक १० मिनिटे चेहऱ्यावर लावा, स्वच्छ पाण्याने धुवा.

2. तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

असा करा वापर

  • तुळशीच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावा. यामध्ये कोरफड जेल घालू शकता.

  • चेहऱ्यावर लावल्यानंतर कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा.

  • यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

3. पेरुची पाने

पेरुची पाने केवळ पिंपल्स दूर करण्यासाठीच फायदेशीर नसतात, तर सुरकुत्याही दूर करु शकतात. यासाठी पेरुची पाने बारीक वाटून घ्या. त्यात दही घालून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT