World Humanitarian Day 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Humanitarian Day 2023 : मानवतावादी दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, उद्देश आणि थीम

Humanitarian Day 2023 : हा दिवस अशा लोकांना समर्पित आहे जे खऱ्या जीवनातील हिरो आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

World Humanitarian Day : दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस अशा लोकांना समर्पित आहे जे खऱ्या जीवनातील हिरो आहेत.

जे लोकांच्या जीवाची पर्वा न करता मदत करायला सदैव तयार असतात. परिस्थिती कशीही असो, ते त्यांच्या कर्तव्याच्या आड येत नाहीत. अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी हा दिवस साजरा (Celebrate) केला जातो.

इतिहास

जागतिक मानवता दिवस पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने साजरा केला. यासाठी सन 2008 मध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता, जे स्वीडनने प्रायोजित केले होते. 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2003 रोजी इराकची राजधानी बगदाद येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर हल्ला झाला होता.

या हल्ल्यात यूएन मुख्यालयातील 22 कर्मचारी ठार झाले, ज्यात इराकमधील UNO महासचिवांचे विशेष प्रतिनिधी सर्जियो व्हिएरा डी मेलो यांचा समावेश आहे. त्यानंतरच 19 ऑगस्ट हा जागतिक (International) मानवता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उद्देश

कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर (Doctor), परिचारिका आणि सामान्य लोकांनी देखील भुकेल्या आणि बेघर लोकांना कशी मदत केली हे आपण सर्वांनी पाहिले. हे महान मानवतेचे उदाहरण होते. आणि इतकेच नाही तर दरवर्षी अनेक देश पूर, भूकंप आणि इतर अनेक दुर्घटनांना बळी पडतात, अशा परिस्थितीत केवळ मानवतावादी लोकच त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. त्यामुळे अशा वेळी जनतेची कोणतीही मदत वरदानापेक्षा कमी नाही. त्यामुळे अशा लोकांच्या आत्म्याला हा दिवस सलाम करतो. इतरांनाही पुढे येण्यास प्रेरित करतो.

थीम

जागतिक मानवतावादी दिन 2023 च्या थीमला "इट टेक्स अ व्हिलेज" असे नाव देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT