World Organ Donation Day 2023 : आज जागतिक अवयवदान दिन! जाणुन घ्या इतिहासापासून थीमपर्यंत सर्व काही...

World Organ Donation Day : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जात आहे.
World Organ Donation Day 2023
World Organ Donation Day 2023Saam Tv

Organ Donation Day : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जात आहे. हा एक जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश लोकांना अवयवदानाचे महत्त्व समजावे.

याशिवाय अवयवदानाच्या गरजेबाबत जनजागृती करण्यासाठीही हा दिवस साजरा (Celebrate) केला जातो. या दिवशी लोकांना अवयवदानाच्या प्रक्रियेबद्दल प्रबोधन केले जाते. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

World Organ Donation Day 2023
World Wide Web Day : वर्ल्ड वाइड वेब डे का साजरा करतात? इंटरनेटपेक्षा कसा वेगळा? जाणून घ्या

इतिहास आणि महत्त्व

हा दिवस अवयवदानाविषयी जनजागृती करण्याची एक उत्तम संधी आहे. याशिवाय अवयवदान प्रक्रियेशी संबंधित गैरसमज दूर करण्यातही हा दिवस महत्त्वाची भूमिका बजावतो.

अवयवदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचून त्याला नवे जीवन मिळू शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. एका अवयवदानामुळे सुमारे सात जणांचे प्राण वाचू शकतात, असे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्येकाने हा दिवस साजरा करून जनजागृतीसाठी त्याचे महत्त्व (Importance) इतरांना समजावून सांगावे.

World Organ Donation Day 2023
World Breastfeeding Day 2023: स्तनपानामुळे महिलांना हृदयविकाराचा धोका कमी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

थीम

जागतिक अवयवदान दिन दरवर्षी वेगळ्या थीमने साजरा केला जातो. या वर्षी, जागतिक अवयवदान दिन 2023 ची थीम आहे “स्टेप अप टू व्हॉलेंटियर; ही पोकळी भरून काढण्यासाठी अधिक अवयवदात्यांची गरज आहे.” (स्वयंसेवक म्हणून पुढे जा; उणीव भरून काढण्यासाठी अधिक अवयवदात्यांची गरज आहे). अवयवदानासाठी लोकांना (People) जागतिक आवाहन करणे हा या थीमचा उद्देश आहे, जेणेकरून एखाद्या अवयवाची गरज भागवता येईल.

अवयवदानाविषयी आपल्या सभोवतालचे गैरसमज दूर करण्याची संधी यानिमित्ताने दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदानाच्या महत्त्वाबाबत आपण जनजागृती केली पाहिजे आणि ते लाखो जीव कसे वाचवू शकतात हे त्यांना समजावून दिले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com