Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
राज ठाकरेंनी भाजपवर उमेदवारांना करोडोंची ऑफर देण्याचा गंभीर आरोप
मुंबईतील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर झाल्याचा दावा
नाशिकमधील संयुक्त सभेत राजकीय वातावरण चांगलेच तापले
मुंबईतील एकाच घरातील तीन उमेदवार आहेत त्यांना पंधरा कोटींची ऑफर झाली. कुठून येतात पैसे? इथपर्यंत तुम्ही परिस्थिती आणली महाराष्ट्राची? असे सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केलाय. राज्यात १५ जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र निवडणुका होण्याआधीच महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यावरून विरोधकांकडून टीका केली जातेय. या मुद्द्यांवरून आज नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आज नाशिकमध्ये झाली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी भाजपवर पैसे वाटण्याचा आरोप केला. भाजप विरोधात उभे राहणाऱ्या उमेदवारांना पैशांची ऑफर देते. एक-एक उमेदवाराला एक-एक कोटींची ऑफर दिली जातेय. जो उमेदवार ऐकत नाही त्याला घाबरवलं जातं. त्याला दम दिला जातो, असा आरोप राज ठाकरेंनी केलाय.
चार वर्षांपूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या याचे उत्तर भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा गोंधळ सुरू आहे, त्याचेही उत्तर दिलं पाहिजे. कोण कुठे चाललंय? कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. तर कोण उमेदवार कोणाचा AB फॉर्म गिळतो.
कोणत्या थराला गेल्यात निवडणुका अशी टीका राज ठाकरेंनी केलीय. निवडणुका होण्याआधी या राज्यात बिनविरोध ६०- ७० जागा निवडून येतात. भाजप उमेदवारांना पैशांची ऑफर केली जातेय. कोणाला १ कोटी तर कोणाला २ कोटी. मुंबईतील कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमदेवारांना तब्बल १५कोटींची ऑफर देण्यात आलीय. इतके पैसे कुठून येतात? इथपर्यंत तुम्ही परिस्थिती आणली महाराष्ट्राची. एकतर माणसं उभी राहू द्यायची नाही. आणि उभी राहिलीतर त्यांना पैसे द्यायचे नाहीतर धाक दाखवला जातो असा आरोप राज ठाकरेंनी केला.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं अनेक पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षातलं. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना ऑफर देईन फोडलं जातं. नेत्यांच्या फोडाफोडीवरून बोलताना राज ठाकरे म्हणाले, 1952 साली जनसंघ नावाचा पक्ष जन्माला आला. त्याला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागत आहे. पण यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची कुचंबणा होते. पक्षात वर्षांवर्ष काम करूनही त्यांना बाजूला सारून बाहेरून आलेल्या माणसांना तिकिट दिली जातात, कार्यकर्त्यांचा अपमान नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

