आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Speech In Nashik Municipal Election: नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Shiv Sena (Thackeray faction) leader Uddhav Thackeray addressing a massive joint rally with Raj Thackeray in Nashik ahead of municipal elections.
Shiv Sena (Thackeray faction) leader Uddhav Thackeray addressing a massive joint rally with Raj Thackeray in Nashik ahead of municipal elections.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामात आज ठाकरे बंधूंची संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येत प्रचाराचे रणशिंग फुंकले. या सभेत दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार शब्दांत टीका करत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले, तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपचं हिंदुत्व खरं आहे की खोटं, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. धर्माची अशी पट्टी लावली गेली की सगळे अंधभक्त झाले आहेत,असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ज्यांना स्वतःच्या राजकारणात पोरं होत नाहीत, त्यांना आमची पोरं पळवावी लागतात. म्हणूनच मोहन भागवत अपत्य वाढवण्याचं आवाहन करत आहेत. भाजप उपटसुंब्यांचा पक्ष झालाय. कुत्ता, बिल्ली सगळंच चालतंय, असा घणाघात केला.

आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो तर फटाके वाजवले गेले आणि दुसऱ्याच दिवशी तिकडे हालचाली सुरू झाल्या, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच मुनगंटीवार म्हणतात शनि शिंगणापूर आणि भाजपला दरवाजे नाहीत उद्या रावणालाही भाजपमध्ये घेतील असे म्हणत भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नाशिककरांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, नाशिकची सत्ता द्या, मुंबई महापालिकेत जे करून दाखवलं तेच नाशिकमध्येही करून दाखवू. सत्ता दिली तर नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारून दाखवू. त्यांनी मुंबईत ३ लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत, या आभद्र युतीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून आगाऊ रक्कम घेऊन ती वाटली जाते, असा दावा केला.

भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही दोन्ही भाऊ मिळून तुम्हाला वचन देतो जे बोलतो ते करून दाखवतो. तुमच्याकडे पैसा असेल, आमच्याकडे जनतेचा विश्वास आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग आधी काढा आणि मग आमच्यावर टीका करा. सेना-मनसेची मजबूत सत्ता द्या, उद्या दत्तक बाप यायलाही घाबरला पाहिजे अशी कडाडून टीका उद्धव ठाकरे यांनी नाशिकला दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com