मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

Raj Thackeray Allegation On Adani Mumbai Airport: मुंबई महापालिकेच्या प्रचारात उद्योगपती गौतम अदानींवरून राजकारण चांगलच तापलयं... राज ठाकरेंनी तर मुंबई विमानतळावरून मोठा गौप्यस्फोट केलाय? हा गौप्यस्फोट नेमका काय आहे आणि त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी कसं उत्तर दिलंय..
Raj Thackeray addresses a public meeting during the Mumbai civic election campaign as the Adani controversy intensifies.
Raj Thackeray addresses a public meeting during the Mumbai civic election campaign as the Adani controversy intensifies.Saam Tv
Published On

मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय... त्यातच मुंबई महापालिकेच्या प्रचारात आता अदानींची एण्ट्री झालीय.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी संयुक्त मुलाखतीतून अदानींवर तोफ डागलीय... एवढंच नाही तर अर्धी मुंबई अदानींच्या नावावर करण्याचा डाव आखला जात असतानाच बुलेट ट्रेनचं स्टेशन धारावीत कसं? असा सवालही ठाकरेंनी केलाय.. तर राज ठाकरेंनी मुंबई विमानतळ अदानींना विकण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप केलाय...

राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत.. तर त्यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर निशाणा साधत फडणवीसांच्या हाती काहीच नसल्याचा खोचक टोला मारलाय... तर राज ठाकरेंच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांनीही तोडीस तोड उत्तर दिलंय..

खरंतर धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्यात आला.. त्यावरुन ठाकरेंसह काँग्रेसनं मोर्चातून संताप व्यक्त केला.. आता या लढ्यात राज ठाकरेंनीही उडी घेत अदानींवर हल्लाबोल केलाय.. आता मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी आणि गुजरातीच्या मुद्दयानंतर ठाकरे बंधू आणि भाजपात अदानींवरूनही संघर्ष रंगल्याचं चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com