BJP and Shinde Sena leaders during election campaigning in Mumbai as alliance tensions surface over controversial slogans.
BJP and Shinde Sena leaders during election campaigning in Mumbai as alliance tensions surface over controversial slogans.saam tv

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

“BJP vs Shinde Sena: मुंबई महापालिकेत भाजप- शिंदेसेनेच्या युतीत वादाची ठिणगी पडलीय... भाजपच्या उमेदवारानं प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा देत शिंदेसेनेला डिवचलयं... त्यामुळे भाजप- शिंदेसेनेतील अंतर्गत वाद कसा चव्हाट्यावर आलाय?
Published on

ही घोषणाबाजी नीट ऐका... महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान घोषणाबाजी करत शिंदेसेनेला डिवचलय...त्यामुळे मुंबई भाजप-शिंदेंच्या दोस्तीत कुस्ती सुरु झालीय.. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप शिंदेसेनेची कार्यकर्ते आमनेसामने आलेत...

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदेसेनेच्या पुजा कांबळे यांच्यात लढत होणार आहे. मात्र शिंदेसेनेविरोधात भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे विरोधकांच्या हाती आयत कोलीत मिळालयं....जे पेरलं तेच उगवलं, अशी टीका ठाकरेसेनेनं शिंदेसेनेवर केलीय...तर घोषणाबाजीचं मला माहिती नाही, मुंबई महायुती एकत्र असल्याचं विधान उपमुख्यंत्री शिंदेंनी केलयं...

खरतर भाजप- शिंदेसेनेच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक 173 ची जागा शिंदेसेनेच्या वाट्याला गेली होती... मात्र शिल्पा केळुस्करांनी भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज भरल्यानं आणि त्यांचा अर्ज वैध ठरल्यानं शिंदेसेनेला नाईलाजानं मैत्रीपूर्ण लढतीला होकार द्यावा लागला... अशातच प्रचारातील घोषणाबाजीमुळे शिंदेसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे..

मात्र खोक्यांची घोषणा चुकून दिल्याची सारवासारव भाजप उमेदवार शिल्पा केळुस्करांचे पती दत्ता केळुस्करांनी केलीय...

छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप-शिंदेसेनेत वाद झाल्यामुळेच युती तुटली. मुंबईत युती असूनही आता सर्वात जिव्हारी लागणारी घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेविरोधात दिल्यामुळे सारंकाही आलबेल आहे का? असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com