Best Cooking Oil For Heart Saam Tv
लाईफस्टाईल

Best Cooking Oil For Heart : सावधान! जेवणात वापरले जाणारे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Healthy Heart Tips :

योग्य जीवनशैली आणि आहार आपल्या हृदयाला निरोगी ठेवते. आहार चांगला असेल तर आपले निरोगी चांगले राहाते. आहाराची काळजी घेण्यासोबतच आपण स्वयंपाकघरात कोणत्या प्रकारे पदार्थ वापरतो हे देखील पाहाणे गरजेचे आहे.

तेलामध्ये अधिक वेगवेगळे घटक असतात ज्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो. चुकीच्या पद्धतीचे तेल हे आपल्या हृदयासोबत कोलेस्ट्रॉल, रक्तदाब सारख्या आजार जडतात. जाणून घेऊया आपल्या स्वयंपाकघरात कोणते तेल असायला हवे.

1. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् (MUFAs) खूप आरोग्यदायी असतात. जे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही, त्यामुळे हृदयाशी (Heart) संबंधित आजारांचा (Disease) धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

2. मोहरीचे तेल

मोहरीचे तेल हे स्वयंपाकघरात (Kitchen) सर्वाधिक वापरले जाणारे तेल आहे, जे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आपले हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. कारण मोहरीच्या तेलात भरपूर अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

3. शेंगदाण्याचे तेल

शेंगदाण्याच्या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. यामध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक असतात आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देखील करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Grand Finale : 'आज की रात...' जान्हवी-निक्कीच्या दिलखेचक अदा, ग्रँड फिनालेला धुरळा उडणार

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

SCROLL FOR NEXT