World Heart Day 2023 : छातीत दुखणे, सतत जळजळणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; असू शकतो गंभीर आजार

Angina Causes : हृदयाला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न मिळाल्यास हा एनजाइनासारख्या आजाराला सामोरे जावे लागते.
World Heart Day 2023
World Heart Day 2023Saam Tv
Published On

Angina Symptoms :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि झोपेचे बिघडलेल तंत्र याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. चुकीच्या वेळी खाल्ल्याने आपल्या अपचन किंवा पोटदुखीसारखे आजार जडतात.

अचानक छातीत दुखणे, जळजळणे हा एक एनजाइनाचा प्रकार आहे. हृदयाला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न मिळाल्यास हा एनजाइनासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. यामध्ये छातीत कळ येणे, दाब जाणवणे किंवा जडपणा येणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. एनजाइनला पेक्टोरिस किंवा इस्केमिक छातीत दुखणे असेही म्हणतात. एनजाइना हे कोरोनरी धमनी या रोगाचे लक्षण आहे. या हृदयविकारामुळे होणारा त्रास पुन्हा पुन्हा होतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

World Heart Day 2023
Healthy Breakfast Food : सकाळच्या नाश्त्यात खा हे 8 सुपरफूड, दिवसभर टिकून राहिल एनर्जी

1. एनजाइना कशामुळे होतो?

हृदयाच्या स्नायूंना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यास एनजाइनाची समस्या उद्भवते. शरीरातील रक्त ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते, त्यामुळे स्नायूंना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा एनजाइना समस्या उद्भवते.

2. कारणं काय?

कोरोनरी धमन्यांच्या चरबी जमा झाल्यामुळे त्या लहान होऊ लागतात. रक्तवाहिन्या आतून आकुंचन पावणे याला एथेरोस्कलेरोसिस असे म्हटले जाते. हा आजार (Disease) कसा जडतो.

  • चुकीचा आहार

  • धुम्रपान

  • खराब कोलेस्टेरॉल

  • लठ्ठपणा

  • मधुमेह (Diabetes)

  • अनुवांशिकता

World Heart Day 2023
Avoiding Salt One Month : महिनाभर मीठ खाल्लं नाही तर? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

3. एनजाइनाची लक्षणे

  • छातीत घट्टपणा जाणवणे

  • छातीवर दाब येणे

  • श्वास घेण्यास अडचण येणे

  • हात आणि खांद्यामध्ये वेदना

  • दात (teeth) आणि जबड्यात दुखणे

  • छातीत जळजळ होणे.

  • घसा आणि मानेमध्ये देखील वेदना जाणवणे.

  • पोटात जळजळ होणे.

  • अशक्तपणा जाणवणे.

  • सतत घाम येणे.

  • आंबट ढेकर येणे.

  • मळमळ होण्याची समस्या.

  • क्रॅम्पिंग.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com