World Earth Day 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

World Earth Day 2024 : स्वयंपाकघरातील या प्लास्टिकच्या वस्तूंना करा बाय बाय, पर्यावरणासाठीच नाही आरोग्यासाठीही हानिकारक

World Earth Day 2024 Date : दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. यावेळची थीम आहे प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक. अशा वेळी आपण पर्यावरणाची होणारी हानी थांबवायला हवी.

कोमल दामुद्रे

Plastic Side Effects On Health :

दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. यावेळची थीम आहे प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक. अशा वेळी आपण पर्यावरणाची होणारी हानी थांबवायला हवी.

आपल्यापैकी अनेकांच्या घरात प्लास्टिकच्या वस्तू सहज पाहायला मिळतात. प्लास्टिकमुळे आपली पृथ्वी (earth) आणि पर्यावरण (Environment) प्रदूषित होते तसेच आरोग्यावरही वाईट परिणाम होतो आहे. आपल्या स्वयंपाकघरात स्टोरेज बॉक्स, पाण्याची (Water) बॉटल, टिफिन असो किंवा चॉपर बोर्ड असो सगळंच काही प्लास्टिकचे असते.

भाजी घ्यायला जातानाही आपण प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करतो. यामुळे पर्यावरणाची सर्वात जास्त हानी होते. अशावेळी आपण आरोग्यासोबतच पर्यावरणाची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

1. प्लास्टिक चॉपिंग बोर्ड

बहुतेक घरांमध्ये प्लास्टिक चॉर्पिंग बोर्ड वापरला जातो. जो आरोग्यासाठी हानिकारक आहे. या प्लास्टिक बोर्डवर आपण भाजी कापतो. यातील प्लास्टिकचे छोटे कण आपल्या शरीरात प्रवेश करतात. हा बोर्ड कधीकधी साफ करणे देखील कठीण होते.

2. प्लास्टिक टिफिन

प्रत्येकाच्या घरात आपल्याला भरपूर प्लास्टिक टिफिन पाहायला मिळतील. हे टिफिन स्वस्त असले तरी त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्लास्टिकच्या टिफिनमध्ये ठेवलेले गरम अन्न आरोग्यासाठी हानिकारक असते. बिस्फेनोफिल-ए- नावाचे विषारी संयुग प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले जातात. ज्याचे कण शरीरात पोहोचून कॅन्सरसारखा घातक आजार होऊ शकतो.

3. प्लास्टिकची बॉटल

आजकाल लोक पाणी पिण्यासाठी बाटल्यांचा वापर करतात. प्रत्येकाच्या हातात प्लास्टिकची बाटली पाहायला मिळते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण प्लास्टिकच्या बाटल्या वापरतात. जे आरोग्यासाठी घातक आहे.

4. प्लास्टिकची पिशवी

जर तुम्ही भाजी किंवा इतर सामानासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करत असाल तर वेळीच थांबा. त्याऐवजी आपण कापडाच्या पिशवीचा वापर करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT