World Cancer Day 2024 Saam tv
लाईफस्टाईल

World Cancer Day 2024 : गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीकरणाकडे महिलांचे दुर्लक्ष, कारण काय?

Cervical Cancer Symptoms : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे भारतातील महिलांमध्ये मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण असले तरी त्याबाबत जागरूकतेचा अभाव आहे. मोठ्या प्रमाणावर 90% नोकरदार महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस उपलब्ध आहे याचीच माहिती नसते. यामुळे सर्व्हायकल कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार होत नाहीत.

कोमल दामुद्रे

Cervical Cancer :

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे भारतातील महिलांमध्ये मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण असले तरी त्याबाबत जागरूकतेचा अभाव आहे. मोठ्या प्रमाणावर 90% नोकरदार महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस उपलब्ध आहे याचीच माहिती नसते. यामुळे सर्व्हायकल कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार होत नाहीत.

वेळेवर उपचार न मिळाल्याने कर्करोग (Cancer) वाढून गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने प्रत्येक स्त्रीने (Women) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी मानवी पॅपिलोमाव्हायरस लस (HPV) आणि नियमित पॅप स्मीअर स्क्रीनिंगबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे.

भारतात, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे एक महत्त्वाचे आरोग्य (Health) आव्हान आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने या कर्करोगाचे पटकन निदान होत नाही.

हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रतिबंध कार्यक्रमांसाठी मर्यादित संसाधनांमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा भार वाढला आहे. गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी लसीकरण करून घेण महत्त्वाचं आहे. कारण देशभरता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाना पिडीत महिलांची संख्या वाढतेय.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कमलेश बोकील म्हणाले की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. धक्कादायक म्हणजे, जवळपास ९०% नोकरदार महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस घेत नाहीत. कारण सर्व्हायकल कॅन्सरव लस उपलब्ध आहे हे त्यांना माहितीच नसते. हा कर्करोग प्रामुख्याने मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) मुळे होतो, ज्याला लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केले जाऊ शकते.

परंतु नोकरी करणाऱ्या महिला व्यस्त असल्याने ते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. लसीकरण करून, केवळ काम करणाऱ्या महिलांनाच नाही तर इतरांनाही पुढील आयुष्यात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमध्ये एचपीव्ही संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण केल्याने केवळ महिलांचे संरक्षण होत नाही तर महिलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासही मदत करते. ज्या स्त्रिया लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहेत त्यांनी न चुकता HPV चाचणी आणि पॅप स्क्रीनिंग करून घेणं करणे आवश्यक आहे.

ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर (तळेगाव) सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मृणाल परब म्हणाल्या की, एचपीव्ही लस आणि नियमित पॅप स्मीअर्सचा गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जीवन वाचवणारी साधने म्हणून गौरव करण्यात आला आहे. मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्ग रोखून, लस गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकते.

व्यापक एचपीव्ही लसीकरण भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांना दूर करू शकते. दुसरीकडे, गर्भाशय ग्रीवामधील असामान्य पेशी बदल लवकर ओळखण्यासाठी नियमित पॅप स्मीअर महत्त्वपूर्ण आहेत, ज्यामुळे कर्करोगाचा विकास होण्यापूर्वी वेळेवर हस्तक्षेप करणे शक्य होते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग १२% ने वाढण्याचा अंदाज आहे आणि २०२५ पर्यंत अंदाजे ८५,२४१ रूग्ण बाधित होतील.

सध्या महिलांचे पॅप स्मीअर चाचणी आणि एचपीव्ही लसीकरण करून घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे आणि बहुसंख्य महिलांना त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे महिलांनी सर्व्हायकल कर्करोगापासून वाचण्यासाठी नियमित पॅप स्मीअर चाचणी आणि एचपीव्ही लसीकरण करून घ्यावेत.

अंकुरा रूग्णालयातली वरिष्ठ सल्लागार आणि प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मधुलिका सिंग म्हणाल्या की, नोकरदार महिला कामाच्या व्यस्त वेळापत्रकापासून घरातील कामे आणि कुटुंब सांभाळण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पेलते. या व्यस्त जीवनशैलीमध्ये, HPV लसीकरण किंवा नियमित पॅप स्क्रीनिंग यांसारख्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपायांसाठी वेळ काढणे अनेकदा मागे पडते. त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांनी आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

नोकरदार महिलांनी HPV लसीकरण किंवा पॅप स्क्रीनिंगकडे दुर्लक्ष करण्याचे एक कारण म्हणजे HPV संसर्ग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंधित जोखमींबद्दल जागरूकता नसणे. सुमारे 90% नोकरदार महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस घेत नाहीत आणि 85% महिलांना कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लसी आणि तपासणीबद्दल माहिती नसते. त्यामुळे सर्व्हायकल कर्करोगाचा वाढता धोका टाळण्यासाठी नियमित एचपीव्ही आणि पॅप स्क्रिनिंग चाचणी करून घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT