दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जगभरात 'जागतिक स्तनपान सप्ताह' साजरा केला जातो. बाळासाठी आईचे दुध हे संपूर्ण आहारा मानले जाते. पहिल्या ६ महिन्यात आई जे काही पदार्थ खाते ते तिच्या मार्फत बाळाचे पोषण करत असतात. त्याचा बाळाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
लहानपणापासूनच आईचे दूध हा मुख्य आहार म्हणून बाळाला न मिळाल्यास त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचा योग्य विकास होत नाही. ज्या बाळांना स्तनपान दिले जात नाही ते स्तनपान न करणार्या बालकांपेक्षा अधिक असुरक्षित आणि आजारी असतात. बाळाच्या तसेच आईच्या आरोग्यावर स्तनपानाचे फायदे कसे होतात जाणून घेऊया.
1. डॉ. मंजिरी मेहता, सल्लागार स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ , फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल (वाशी, नवी मुंबई) म्हणतात की आईचे दूध हे बाळाच्या (Newborn baby) जन्मापासून ते 6 महिने वयापर्यंत परिपूर्ण आहार आहे. या काळात बाळाला पाणीही दिले जात नाही. मूल जितके जास्त आईचे (Mother) दूध पिईल तितके ते शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत होईल.
मात्र, आजही अनेक माता प्रसूतीनंतर योग्य दूध तयार करू शकत नाहीत, त्यामुळे बाळाला दूध पाजावे लागते. अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना असे वाटते की स्तनपान केल्याने त्यांचे स्तन खराब होतील, ते लठ्ठ होतील. असं अजिबात नाही, पण नवजात आईच्या आरोग्यासाठी स्तनपान करणंही खूप महत्त्वाचं असतं.
2. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला दूध पाजता तेव्हा ते वजन वाढवत नाही तर कमी करते. जर दुधाचे उत्पादन योग्य असेल आणि तुम्ही तुमचे दूध बाळाला पाजले नाही तर हे दूध स्तनात राहिल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. यामुळे स्तन घट्ट होतात. जेव्हा तुम्ही तुमचे दूध तुमच्या बाळाला पाजता तेव्हा या प्रक्रियेदरम्यान कॅलरीज आवश्यक असतात. अशा प्रकारे शरीरातून कॅलरीज (Calories) कमी करता येतात.
3. डॉक्टर सांगतात की, स्तनाचा कर्करोग, ऑस्टिओपोरोसिस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, संधिवात, गर्भाशयाचा कर्करोग, लठ्ठपणा इत्यादी अनेक गंभीर आजारांचा धोका स्तनपानामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
4. बाळाला स्तनपान करून, सर्व आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा आईच्या दुधाद्वारे केला जातो. बाळाला अनेक गंभीर आजारांपासून वाचवता येते, जसे की कान, डोळे, श्वसन संक्रमण, दमा, अतिसार, पोटाशी संबंधित समस्या, लठ्ठपणा, ऍलर्जी इत्यादी. आईच्या दुधात अँटीबॉडीज असल्यामुळे बाळाला व्हायरल, बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण मिळते. आईचे दूध प्यायल्याने मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत होते. बाळाच्या मेंदूचा विकास वेगाने होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.