कोमल दामुद्रे
लठ्ठपणा हा वाढत्या वयानुसार वाढत जाणारा आजार आहे. काही लोकांचे वजन हे झपाट्याने वाढते. त्यामुळे ते कमी करताना नाकीनऊ येतात.
बदलेल्या जीवनशैलीनुसार हल्ली अनेकजण नोकरी करतात. पण डेस्क जॉब व बैठी जीवनशैलीमुळे वजन लवकर वाढते.
पण वजन का वाढते व ते वाढू नये यासाठी महिलांनी काय करावे हे जाणून घेऊया.
अनहेल्दी डाएट, कॅलरीयुक्त पदार्थ, प्रोसेस्ड फूड्स, सोडा, शुगर ड्रिंक्स, अनहेल्दी फॅट, आहारात सोडियमचे प्रमाण जास्त यामुळे वजन वाढते.
हे सर्व पदार्थ शरीराचे वजन वाढवण्याचं काम करतात. त्यासाठी हेल्दी पदार्थ खा.
गर्भधारणा, मेनोपॉज, हार्मोन्समध्ये बदल किंवा इतर आजारांमुळे स्त्रियांचे वजन वाढू शकते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या व आहाराकडे लक्ष द्या
स्ट्रेस, डिप्रेशन, व इतर मानसिक कारणांमुळे खाण्यापिण्याच्या सवयीवर परिणाम होतो. काही लोकं स्ट्रेस इटिंग करतात. ज्यामुळे वजन वाढीची समस्या निर्माण होते.
आनुवंशिक कारण, मेटाबॉलिज्म स्लो असणे, चरबी जमा होणे, याचा थेट परिणाम खाण्यावर होतो त्यामुळे वजन वाढते.
सतत औषधांचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो त्यामुळे वजन वाढू शकते.
वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, योग, व्यायामासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अतिरेकी डाएट न करता आपली जीवनशैली कशी उत्तम राखता येईल याकडे लक्ष द्या.