working mother time management tips saam Tv
लाईफस्टाईल

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

Work Life Balance : आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला अव्वल स्थानी कार्यरत आहेत. बहुतेक महिला नोकरीसह घरकाम सांभाळतात. या दोन्ही गोष्टी सांभाळत त्यांची दमछाक होत असते.

Saam Tv

मुलांच्या जबाबदारीमुळे अनेकदा तणाव वाढतो.घर आणि बाहेरची कामे एकत्र सांभाळणे सोपे नसते आणि जर तुम्ही वर्किंग मदर असाल, तर हे आणखीनच कठीण काम असते . एका बाजूला ऑफिसची मीटिंग आणि काम पूर्ण करण्याचे टेन्शन असते, तर दुसरीकडे घरी सोडून आलेल्या मुलाची काळजी असते. अशा परिस्थितीत वर्किंग मदर्स आपल्या आयुष्यात ताळमेळ कसा राखू शकतात हे जाणून घेऊया:

ऑफिसचे कामाचे व्यवस्थित नियोजन करा :

आई झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा कामावर जाता, तेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसच्या काम उत्तम प्रकारे आयोजित करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरुन घरी पोचल्यावर तुम्ही पूर्णपणे मोकळे राहू शकाल. टाइम मॅनेजमेंट योग्य राहावे म्हणून आपले काम पूर्ण नियोजनासह करा. याबद्दल तुमच्या सहकाऱ्यांसोबतही चर्चा करा.घरी असताना तुम्हाला वारंवार मेल्स, मेसेज किंवा कॉल्स येणार नाहीत. तसेच, तुम्ही अधूनमधून वर्क फ्रॉम करण्याचा प्रयत्न करु शकता.

जोडीदारासोबत जबाबदाऱ्या शेअर करा :

तुम्ही वर्किंग असाल तर तुमच्या जोडीदारानेही जबाबदारी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हवे असल्यास तुम्ही दोघे आपापल्या शिफ्ट बदलू शकतात. समजा तुम्ही मॉर्निंग शिफ्ट करत असाल, तर जोडीदार नाइट शिफ्ट करू शकतो.यामुळे प्रत्येक वेळी आई किंवा वडील यांपैकी कोणी ना कोणी मुलाजवळ असते आणि मुलालाही जुळवून घेणे सोपे जाते. तुम्ही वेगळे कुटुंबात राहत नसाल आणि एकत्र कुटुंबात राहत असाल, तर ही आणखी चांगली गोष्ट आहे जेणेकरुन आजी-आजोबांपैकी कोणी ना कोणी मुलांची काळजी घेऊ शकते.

घरात मुलांसाठी याप्रकारे तयारी करा:

तुम्ही नसताना मुलाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही, अशा पद्धतीने घरातील गोष्टींची रचना करून जाणे आवश्यक आहे. मुलाच्या लहान-लहान वस्तू वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवा आणि त्यांची एक यादी बनवा आणि ती कुठेतरी कुठेतरी चिटकवू ठेऊ शकता. तसेच प्रत्येक साहित्याची एक जागा निश्चित करा. यामुळे तुमच्या घरी काम करणाऱ्या महिलेला वस्तू शोधण्यात अडचण येणार नाही. आणि ती वेळेवर जेवणापासून ते मुलाची औषधे यांची 0व्यवस्था योग्य प्रकारे करू शकेल. मूल थोडे मोठे असेल तर त्याला स्वतःहून गोष्टी शोधणे सोपे जाईल.

मुलांसाठी क्लालिटी टाइम निश्चित करा:

वर्किंग महिलांसाठी आपल्या मुलाशी संवाद कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्यातील नाते कमजोर होणार नाही. तुम्ही आणि तुमचे मूल मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधू शकाल अशी वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. यादरम्यान मूल तुमच्यासोबत काही क्वालिटी टाईम घालवू शकेल. या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखण्यासाठी खूप मदत करू शकतात.

मुलांशी कनेक्ट राहा:

मॅटरनिटी लिव्ह संपल्यानंतर मुलाला घरी सोडून ऑफिसला येणे हा आईसाठी अत्यंत कठीण काळ असतो. अशा वेळी कामाच्या दरम्यान मुलाच्या सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे. आजच्या काळात हे खूप सोपे झाले आहे. तुम्ही दिवसाघरी ऑडिओ-व्हिडिओ कॉल करून मुलाची विचारपूस करू शकता. यामुळे मूल तुमच्याशी जोडलेले राहील आणि त्याला एकटेपणा जाणवणार नाही. हळूहळू ही सवय मुलाच्या रुटीनचा भाग बनते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास मालेगाव संगमेश्वर येथे बेड्या

राज्यात सूर्य आग ओकणार; कुठे किती तापमान? वरुणराजा कुठे बरसणार?

kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

Sunday Horoscope: मेषसह या 3 राशींसाठी आजचा दिवस खास; कामात यश, मिळणार आनंदाची बातमी

हॉकी संघाने इतिहास घडवला! टीम इंडियानं आशियाई क्रीडा स्पर्धेत पाचव्यांदा जिंकलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT