Laptop Health Side Effects SAAM TV
लाईफस्टाईल

Laptop Health Side Effects : सावधान! लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करणं आरोग्यास घातक, गंभीर आजारांना देते आमंत्रण

Laptop Carry Tips : वर्क फ्रॉम होम करताना बऱ्याच वेळा लॅपटॉप मांडीवर ठेवून आपण काम करतो. जे आरोग्यासाठी घातक आहे. लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्याने शरीराच्या अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

Shreya Maskar

आजकाल वर्क फ्रॉम मोठ्या प्रमाणात चालत आहे. त्यामुळे लोक घरून काम करत आहेत. तसेच ऑनलाइन काम करण्याचे प्रमाणही वाढले आहेत. अशावेळी आपण लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करायला लागतो. पण यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. दीर्घकाळ लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्याने त्वचा, डोके आणि प्रजनन संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना आरोग्याची विशेष काळजी घ्या.

शुक्राणूंवर परिणाम

पुरुषांनी लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यास त्यांच्या आरोग्याला धोका पोहचतो. लॅपटॉपमधून येणारी गरम हवा शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम करते.

प्रजनन संस्थेवर परिणाम

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. महिलांनी वर्क फ्रॉम होम करताना याची विशेष काळजी घ्यावी. तुमची छोटीशी चूक आरोग्य खराब करेल.

पाठदुखी वाढते

सतत मांडीवर लॅपटॉप घेऊन काम केल्याने आपण चुकीच्या पद्धतीने बसू लागतो. यामुळेपाठीच्या कण्याला त्रास होतो आणि पाठदुखी सुरु होते. तसेच रक्ताभिसरण होण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लॅपटॉप टेबलवर ठेवून वापरावा.

स्नायूंना दुखापत

सतत लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्याने मांसपेशी आणि स्नायूंना दुखापत होते. लॅपटॉपमधून निघणारी उष्णतामुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो. तसेच पोटांचे विकार सुरु होतात.

त्वचेची आग

दीर्घकाळ लॅपटॉप मांडीवर घेऊन काम केल्यास त्वचेची जळजळ होते. तसेच मांडीच्या त्वचेला संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

लॅपटॉप टेबलवर ठेवून वापरा

लॅपटॉपवर काम करायचे असल्यास कधीही लॅपटॉप टेबलवर ठेवून काम करावे. त्यांमुळे पाठीचे आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पुरेसा प्रकाश ज्या ठिकाणी असेल तेथे बसून लॅपटॉपवर काम करावे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT