ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल काम करण्यासाठी आपण तासन् तास एका जागेवर मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसतो.
पण हे इलेक्ट्रॉनिक गॅजेटस तुमच्या आयुष्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
जास्तवेळ मोबाईल आणि लॅपटॉप वापरल्यामुळे तुम्हाला स्पॉन्डिलिसीसचा त्रास होऊ शकतो.
मोबाईल आणि लॅपटॉपच्या अति वापरामुळे तुम्हाला टाईप - २ मधुमेह होऊ शकतो.
मोबाईल आणि लॅपटॉपमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांमुळे कर्करोग सारख्या समस्या होऊ शकतात.
जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
मोबाईल आणि लॅपटॉपमधील किरणांमुळे तुमची दृष्टी कमकुवत होते आणि डोळ्या संबंधीत समस्या होऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.