Manasvi Choudhary
स्पोर्ट्स हर्निया म्हणजे मांडीचा सांधा किंवा खालच्या ओटीपोटात स्नायू आणि अस्थिबंधन फाटणे किंवा ताणणे.
स्पोर्ट्स हर्नियाला एॅथलेटिक पबल्जिया, स्पोर्ट्समॅन्स हर्निया असे देखील म्हणतात.
स्पोर्ट्स हर्निया झाल्यास ओटीपोटात खालच्या बाजूला तसेच मांडीच्या स्नायूंना दुखते.
ज्यांना स्पोर्ट्स हर्निया होतो त्यांना दुखापतीमुळे मज्जातंतूचा त्रास देखील होतो.
स्पोर्ट्स हर्निया हा मुख्यत: खेळाडूंना होण्याची शक्यता असते.
अचानक दिशा बदलल्याने किंवा वेगाने वळल्याने स्पोर्ट्स हर्निया होतो.
फुटबॉल, कुस्ती आणि हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंना स्पोर्ट्स हर्निया होण्याची शक्यता असते.