Pregnancy infections SAAM TV
लाईफस्टाईल

महिलाचे ५ वेळा मिसकॅरेज, तपासणीत पती-पत्नीची 'ही' १ सवय समोर आली; डॉक्टर म्हणाल्या, 'आता तरी...'

Smoking During Pregnancy : सलग ५ वेळा गर्भपात झाल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत पती-पत्नीची धूम्रपान आणि गुटखा सेवनाची सवय समोर आली.

Namdeo Kumbhar

five miscarriages due to smoking habit : मूल व्हावे हे प्रत्येक जोडप्याचे स्वप्न असते, पण एका महिलेला मात्र सलग ५ वेळा गर्भपाताचे दुःख सहन करावे लागले. वारंवार होणाऱ्या या मिसकॅरेजमुळे कुटुंब हादरले होते. अखेर डॉक्टरांनी जेव्हा पती-पत्नीची कसून वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्या दोघांची अशी एक दैनंदिन सवय समोर आली, जी थेट गर्भपाताला कारणीभूत ठरत होती. हा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर डॉक्टरांनीही या जोडप्याला 'आता तरी ही सवय बदला' असा सल्ला दिला आहे.

मिसकॅरेज होण्याची अनेक कारणे असू शकतात, पण कधीकधी एका सवयीमुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा मोगरी यांच्याकडे एका महिलेच्या ५ वेळा गर्भपात झाल्याचे प्रकरण आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी स्पष्ट केले की, जोडप्याच्या काही सवयींचा गर्भाशयातील बाळाच्या वाढीवर परिणाम होत होता. ती सवय म्हणजे सिगारेट ओढण्याची आणि गुटखा खाण्याची सवय; या व्यसनामुळे महिलेचा वारंवार गर्भपात होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डॉ. मोगरी यांनी त्या मिसकॅरेज झालेल्या महिलेसोबत आलेल्या नातेवाईकाकडे विचारपूस केली की, सिगारेट किंवा गुटखा खाण्याची सवय आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की, गर्भवती झाल्यापासून तिने धूम्रपान केलेले नाही. मोगरी म्हणाल्या की, म्हणजे याआधी धूम्रपान करत होती. नवराही धूम्रपान करतो का? त्यावर होकार मिळाला.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मोगरी यांनी सांगितले की, जर एखादे जोडपे मूल होण्याच्या नियोजनादरम्यान धूम्रपान करत असेल किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करत असेल, तर त्याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. अनेकदा मूल दोषासह जन्माला आल्याचे समोर आले आहे. त्या बाळावर औषधे आणि उपचार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. तंबाखू आणि सिगारेटमध्ये निकोटीन आणि इतर हानिकारक पदार्थ असतात, ज्यामुळे बाळापर्यंत योग्य रक्तप्रवाह आणि आवश्यक पोषक तत्वे पोहोचण्यास अडथळा येतो. याचा परिणाम गर्भाशयातील बाळाच्या वाढीवर होऊ शकतो आणि त्यामुळेच गर्भपात होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

संतापजनक कृत्य! सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला,पोटात हवा गेल्यानं कामगाराचा मृत्यू

Running Benefits: वजन कमी करायचं आहे? मग दररोज ३० मिनिटं धावण्याची सवय लावा, शरीराला होतील हे ७ फायदे

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

२० वर्षे आमदार राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT