Urad Dal Khichdi Google
लाईफस्टाईल

Urad Dal Khichdi: हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर उडीद डाळीची खिचडी; रेसिपी पाहा

Urad Dal Khichdi Recipe: हिवाळ्यात शरीराला उबदारपणा महत्त्वाचा असतो. त्यासाठी गरम पदार्थ खायचे असतात. या काळात तुम्ही उडीद डाळीची खिचडी खाऊ शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Special Urad Dal Khichdi Recipe:

थंडीच्या दिवसात शरीराला गरम ठेवण्यासाठी आहारात गरम पदार्थांचा समावेश करावा. गरम पदार्थ खालल्याने शरीराला उबदारपणा जाणवतो आणि शरीरी सृदृढ राहते. यासाठी थंडीत बाजरी, उडीद, डाळी खाल्ल्या जातात. या डाळींची खिचडीदेखील घरात बनवली जाते. घरात सामान्यतः मुगाच्या डाळीची खिचडी, तांदळाच्या डाळीची खिचडी बनवली जाते. परंतु तुम्ही कधी उडीद डाळीची खिचडी खाल्ली आहे का? उडीद डाळीची खिचडी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. ही खिचडी खालल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतात. आज आम्ही तुम्हाला उडीद डाळीची चटपटीत खिचडीची रेसिपी सांगणार आहोत. (Latest News In Marathi)

साम्रगी

  • तांदूळ

  • उडीद डाळ

  • कोबी

  • बटाटे

  • हिरव्या मिरच्या

  • मटर

  • हलद

  • हिंग

  • जीरे

  • मीठ

  • तूप

  • गरम मसाला

कृती

  • सर्वप्रथम उडीद डाळीची खिचडी बनवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या.

  • गॅसवर कुकरमध्ये एक चमचा तूप टाका. त्यानंतर जिरे, हिरवी मिरची, हिंग टाकून चांगल परतून घ्या.

  • यानंतर त्यात मटार, बटाटा, टॉमेटो आणि कोबी टाका. यानंतर हे मिश्रण पाच मिनिटे परतून घ्या

  • या मिश्रणात गरम मसाला टाका. त्यानंतर त्यात उडीद डाळ आणि तांदूळ टाका. यात ३-४ कर पाणी टाकून झाकण लावून घ्या. कुकरच्या ३-४ शिट्ट्या घ्या. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Saree Jewellery: जड साडीसोबत हा डिझायनर कडा नक्की कार ट्राय मिळेल रॉयल लुक

Fort : पावसाळ्यात किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

Darya Ghat: मुंबई- पुण्यापासून जवळील दाऱ्या घाट कधी पाहिला का? निसर्गसौंदर्यचा अद्भूत नजारा अनुभवा

Mumbai - Goa Highway : रायगडमध्ये पावसाचं थैमान; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी | VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर रूक्षपणा आला आहे? 'या' ट्रिक्स वापरून बघा

SCROLL FOR NEXT