Artificial Intelligence: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! परिक्षा डोक्यावर, अभ्यास झाला नाही तर एआय टूल्स करणार मदत

AI Tools For Students: परिक्षा डोक्यावर आहे. परंतु अभ्यास झालेला नसेल तर टेन्शन घेऊ नका. एआयचे तीन टूल्स तुमची मदत करतील. हे टूल्स कोणते आहेत, ते आपण जाणून घेऊ या.
AI Tools For Students
AI Tools For StudentsSaam Tv
Published On

AI Tools For Exam Preparation

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. आता परिक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना AI टूल्सची (AI Tools) मदत घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं टेन्शन मिटलं आहे. या टूल्समुळे परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होऊ शकते. या साधनांचा वापर करून तुम्ही अभ्यास चांगल्या रितीने आणि अधिक प्रभावीपणे करू शकता. (latest marathi news)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित साधने तुम्हाला कमी वेळेत अभ्यास करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेचे खूप टेन्शन असेल, तर तुम्ही या एआय टूल्सची मदत घेऊ (AI Tools For Exam Preparation) शकता. हे तुम्हाला त्वरीत तयारी करण्यास मदत करेल जेणेकरून तुम्ही परीक्षा उत्तीर्ण करू शकता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभ्यासासाठी तीन एआय टूल्स

परीक्षेचा ताण, तयारीचे ओझे आणि वेळेचा अभाव या सर्वांचा एकत्रितपणे विद्यार्थ्यांना त्रास होतो. पण घाबरू नका, कारण आता तुम्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी AI टूल्सची मदत घेऊ (AI Tools For Students) शकता. हे केवळ परीक्षेची तयारी करणे सोपे करणार नाही तर वेळेवर पुनरावृत्ती करण्यास देखील मदत करते. हे टूल्स कोणकोणते आहेत, ते आपण जाणून घेऊ या.

1. pdf.ai

क्षेत्र कोणतंही असो, पीडीएफ महत्त्वाची आहे. जर तुम्ही PDF वापरत असाल तर pdf.ai टूल तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी मदत करू शकते. त्याच्या वेबसाइटला भेट द्या. त्यावर पुस्तकाची PDF किंवा इतर अभ्यास सामग्री अपलोड करा. यानंतर, तुम्हाला पीडीएफमधून जे हवे ते तुम्ही विचारू शकता. हे तुम्हाला अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला महत्त्वाचे विषय आणि संकल्पना कमी वेळात मिळतात, उत्तरे देताना पान क्रमांकही मिळतो. परिणामी वेळ वाचतो.

2. चॅटजीपीटी

ChatGPT एक लोकप्रिय AI चॅटबॉट आहे. हे जगभरात वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. यातून अभ्यास करायचा असेल तर योग्य तो प्रॉम्प्ट द्यावा लागेल. प्रॉम्प्ट म्हणजे एक प्रकारचा प्रश्न किंवा चौकशी असते. तुम्ही परिक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे, विषय, संकल्पना, विषय ChatGPT वर विचारू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचं वय सांगून उत्तरे लक्षात ठेवण्याचा किंवा जाणून घेण्याचा सोपा मार्ग ChatGPT ला विचारू शकता.

3. Witeboard.com

हे AI टूल तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाइन व्हाईटबोर्ड वापरण्यास मदत करते. या व्हाईटबोर्डवर तुम्ही महत्त्वाचे विषय आणि संकल्पना लिहू शकता. नोट्स बनवू शकता आणि प्रतिमा काढू शकता. याशिवाय, तुम्ही हा व्हाईटबोर्ड तुमच्या वर्गमित्रांसह शेअर करू शकता. तुम्ही ते शेअर केल्यावर, तुमची व्हाईटबोर्ड स्क्रीन तुमच्या वर्गमित्राच्या फोनवर दिसते. याद्वारे दोघेजण मिळून तयारी करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com