हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. ही समस्या टाळण्यासाठी लोक ज्यास्त बॉडी लोशनचा वापर करतात. प्रत्येक त्वचेच्या प्रकारानुसार बॉडी लोशन बाजारात उपलब्ध आहे, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पण, बॉडी लोशनमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागल्याचे अनेकदा दिसून आले आहे. बॉडी लोशनमुळेही काही समस्या उद्भवू शकतात हे अनेकांना समजत नाही. परंतु जास्त प्रमाणात बॉडी लोशन वापरले गेले तर तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
चेहऱ्यावरचे बंद छिद्र
प्रत्येक बॉडी लोशनमध्ये तेलकट घटक असतात जे चेहऱ्याचे नाजूक छिद्र बंद करू शकतात. यामुळे ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स आणि पिंपल्स होऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्याचा अतिवापर केल्यास या समस्या उद्भवू शकतात.
तेलकट चेहऱ्याची समस्या
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जास्त बॉडी लोशन लावल्यामुळे ही त्वचा अजून तेलकट होऊ शकते. अशा परिस्थितीत, फक्त आपल्या त्वचेनुसार बॉडी लोशन वापरा.
ॲलर्जी
हिवाळ्यात त्वचा अधिक संवेदनशील बनते. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त प्रमाणात बॉडी लोशन वापरत असाल तर त्यामुळे ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.
मुरुमांची समस्या
बॉडी लोशनमध्ये आढळणारे तेलकट घटक चेहऱ्याच्या छिद्रांमध्ये अडकतात, ज्यामुळे मुरुम होऊ शकतात. अशा परिस्थितीत चेहऱ्यासाठी नेहमी फेस क्रीम वापरा, जेणेकरून तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
त्वचेची खराब होऊ शकते
चेहऱ्यावर बॉडी लोशन वापरल्याने त्वचा खूप तेलकट होऊ शकते किंवा नैसर्गिक ओलावा काढून कोरडेपणा येऊ शकतो. चेहऱ्याच्या त्वचेची स्वतंत्रपणे काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, कारण ती शरीराच्या इतर त्वचेपेक्षा जास्त संवेदनशील असते.
Edited by - अर्चना चव्हाण