Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

priyanka chopra skin care: प्रियांका चोप्राचे सध्याचे वय ४२ आहे. या वयातही तिची त्वचा तरुणाईला लाजवेल अशी आहे. प्रियांका म्हणते
Priyanka Chopra
Priyanka Choprainstagram
Published On

बॉलिवूडची 'देसी गर्ल' नेहमीच तिच्या फॅशनमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत राहत असते. प्रियांका चोप्रा बॉलिवूड आणि हॉलीवूड या क्षेत्रांमध्ये सौंदर्याची छाप पाडत असते. प्रियांका चोप्राचे सध्याचे वय ४२ आहे. या वयातही तिची त्वचा तरुणाईला लाजवेल अशी आहे. प्रियांका म्हणते ' सौंदर्याचे गुपित म्हणजे आत्मविश्वास. चांगले कपडे आणि मेकअप असेल आणि जर आत्मविश्वास नसेल तर आपण आकर्षक दिसत नाही.' चला तर ही अभिनेत्री सुंदर आणि चमकदार ग्लोइंग त्वचेसाठी नेमकं काय करते? जाणून घेवू.

तांब्याच्या भांड्यांचा वापर

अभिनेत्री प्रियांका चोप्रा एक गोष्टीचा नियम कधीच मोडत तो म्हणजे, तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे. रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या ग्लासात ती पाणी पिते. त्याने शरीराच्या इम्युनिटी बळकट होते. आपली हाडे मजबूत होतात. सोबत आपली त्वचा ताजीतवानी दिसते. पुर्वी बरीच थोर मंडळी तांब्यांच्या भाड्यांचा वापर करायचे. त्याचा फायदा शरीराला मोठ्या प्रमाणात होत असतो.

Priyanka Chopra
Beauty Tips: सणासुदीला मेकअप कसा कराल? जान्हवी कपूरने सांगितलेल्या खास टिप्स

झोपताना 'या' गोष्टींचा नियम

बॉलिवूडची प्रियांका नेहमी झोपताना त्वचेची काळजी घेते. त्यात सर्वप्रथम ती मेकअप रिमूव्हरने संपूर्ण चेहरा स्वच्छ करते. मग फेस वॉशने चेहरा धुवून घेते. त्यानंतर चेहऱ्याला सीरम लावून स्कीन हायड्रेट करते. शेवटी डोळ्यांसाठी आय क्रीमचा वापर करते. ज्यामुळे डोळ्यांभोवती डार्क सर्कल येण्याची शक्यता कमी होते. या टिप्स मुळे सकाळी उठल्यावर तिचा चेहरा चमकदार दिसतो.

फेशियलचा वापर

अभिनेत्री प्रियांका नेहमी महिन्यातून किमान दोन वेळा फेशियल करते. फेशियलमुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. तसेच आपण फ्रेश राहतो. सोबत प्रियांका भरपूर पाणी पिते. त्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा धोका टळतो. यात ती आठवडाभरात घरगुती फेस मास्कचा वापर करते. त्यात बेसन, चिमूटभर हळद, दही, लिंबाचा रस आणि रोज वॉटर यांचे मिश्रण करुन फेस मास्क तयार करते.

Edited By: Sakshi Jadhav

Priyanka Chopra
Beauty Skin Tips : चेहऱ्यावरील तेज मोत्यासारखं चमकवेल हा हर्बल चहा; एक घोट घेताच दिसेल जादू

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com