प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या जीवशैलीनुसार बदलत असतात. आता बरीच मंडळी घरचे खाणे पसंत करत नाहीत. काहींना बाहेरच्या खाण्याची इतकी सवय होते की एखाद्या दिवस घरी राहिल्याने त्यांना जेवणाच्या सुंगधाने मळमळू लागत. अर्थातच ही सवय खूप वाईट आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर मिळणारे पदार्थ घरीच स्वच्छ आणि हेल्दी पद्धतीने तयार करू शकता. आता आपण टेस्टी क्रिस्पी मोमोज घरच्या घरी तयार करण्याची रेसिपी पाहणार आहोत.
मोमोजसाठी भाज्या
कोथिंबीर - १ कप
गाजर - १ कप
बटाटे - १ कप
कांदा - १ कप
लसूण - २-३
अदरक - १ इंच
मीठ - चवीनुसार
मिरपूड - चवीनुसार
कोथिंबीर पूड - चवीनुसार
मोमोज तयार करण्याची कृती
सर्वप्रथम मैदा, पाणी, वनस्पती तेल आणि मीठ मिसळून कणीक तयार करा. आता पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवा. तोपर्यंत कोथिंबीर, गाजर, बटाटे, कांदा, लसूण, अदरक, मीठ, मिरपूड आणि कोथिंबीर पूड चिरून घ्या. हे झालयावर गॅस ऑन करा. एक पॅन ठेवून त्यात तेल टाकून सर्व भाज्या तेलात फ्राय करून घ्या. मोमोजचे फीलिंग आता तयार आहे.
आता पीठ घ्या. त्याचा एक गोळा करून मोदका प्रमाणे त्यात भाज्या करून घ्या. आता तयार मोमोज एका वाजूला ठेवा. त्यात जास्त मोमोजमध्ये भाज्या कमी भराव्या. त्याने मोमोज तळताना ते फिलिंग बाहेर येत नाही. आता एका कढईत तेल तापवून घ्या. मग मोमोज तळायला सुरुवात करा. ५ ते ६ मिनिटात व्यवस्थित तळले जातात. क्रिस्पी मोमोज तयार आहेत. त्यांना विविध चटण्यासोबत सर्व्ह करा.
Edited By: Sakshi Jadhav