Diabetes Cotrol
Carrotcanva

Diabetes Cotrol: आरोग्यसाठी गाजर आहे फायदेशीर; रक्तदाब आणि मधुमेह होईल कमी जाणून घ्या इतर फायदे

Benefits of Carrots: तुम्हाला उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाची समस्या असल्यास गाजर ठरेल फायदेशीर.
Published on
पदार्थांमध्ये वापर
Carrot SoupSaam Tv

पदार्थांमध्ये वापर

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गाजर वापरली जातात. पावभाजी, पुलाव, चायनिज राईज, कशिंबीर, हलवा सारख्या पदार्थांमध्ये गाजर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे त्यापदार्थांमध्ये चव वाढते.

वजन
WeightlossCanva

वजन

बाजारामध्ये गाजर अनेक काळ पहायला मिळतं त्यामुळे भरपूर वेळा गाजराचा आहारात समावेश पहायला मिळतो. तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये गजराचं सूप पिऊ शकता.

निरोगी शरीर
Carrot and beetrootCanva

निरोगी शरीर

गाजर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात त्यामधील गुणधर्म तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. गाजरमधील पोषक घटक तुमच्या संपुर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करतो.

लठ्ठपणाचा त्रास
Belly Fat saam tv news

लठ्ठपणाचा त्रास

गाजरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित रहाण्यास मदत होते त्यामुळे लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात गाजराचे समावेश करा.

डोळ्याचे आरोग्य
Eye Care TipsYandex

डोळ्याचे आरोग्य

तुम्हाला डोळ्या संबंधीत समस्या आसल्यास तुम्ही गाजराचे सेवन करू शकता. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आढळतं ज्यामुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.

रक्तदाबाची समस्या
Blood Pressure HealthYandex

रक्तदाबाची समस्या

तुम्हाला जर उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास तुम्ही आहारात गाजरचा समावेश करू शकता. गाजरमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळतं ज्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो.

त्वचेचं आरोग्य
Skin ProblemsSaam Tv

त्वचेचं आरोग्य

तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गाजर उपयुक्त ठरतं. गाजरमध्या भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य सुधारतं त्यासोबतच पिंपल्स, काळे वर्तुळां सारखे समस्या उद्भवतात.

टीप
Carrot juice canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com