saam tv
लाईफस्टाईल

Kidney: थंडीत केलेली १ चूक ठरते किडनी निकामी होण्याचं कारण, डॉक्टारांनी दिली महत्वाची माहिती

Winter Health: थंडीच्या दिवसांत पाणी कमी पिणे आणि संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका.

Sakshi Sunil Jadhav

सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. या दिवसांमध्ये प्रत्येकजण आपापल्या आरोग्याची काळजी घेतो. त्यासाठी स्वेटर, मोजे, गरम पाणी, गरम चहा-कॉफी या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण फक्त इतक्याच गोष्टी करून आपण थंडीत हेल्दी किंवा निरोगी राहू शकत. कारण थंडीत अनेक आजार वाढत असतात. त्यामध्ये किडनी खराब होण्याच्या समस्या जास्त वाढत असतात. पुढे आपण याचं कारण आणि घ्यावी लागणारी काळजी जाणून घेणार आहोत.

किडनी म्हणजेच मुत्रपिंड हे शरीरातलं रक्त शुद्ध ठेवण्याचं काम करत असतं. त्यात थंडीत डिहायड्रेशन, कमी रक्तप्रवाह आणि संसर्गाच्या धोक्यामुळे किडनीवर ताण येतो. मुंबईतील चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या झेन अ‍ॅनेक्सचे सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. आदित्य नायक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, थंडीत लोकं कमी पाणी पितात आणि जास्त वेळ घरात राहतात.

त्यामुळे मूत्रमार्ग संसर्ग (Urinary tract infection) होण्याचा धोका वाढतो. याने आधीपासून असलेल्या किडनीच्या आजारांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. थंडीच्या दिवसांत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मंदावते आणि बॅक्टेरिया-व्हायरसशी लढण्याची क्षमता कमी होते. किडनीच्या रुग्णांमध्ये ही स्थिती जास्त धोकादायक असू शकते.

थंडीत म्हणजेच अचानक किडनी निकामी होण्याची प्रकरणं वाढताना दिसतात. संसर्ग, डिहायड्रेशन किंवा रक्तप्रवाह कमी होणं ही त्यामागची प्रमुख कारणं ठरतात. थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकसल्या जातात, त्यामुळे किडनीकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि किडनीवर ताण येतो, असं नमूद करण्यात आलं आहे.

तुम्ही यावर उपाय म्हणून, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक लसीकरण करून घ्यावं, असा सल्ला डॉ. नायक यांनी दिला आहे. लसीकरणामुळे आजार पूर्णपणे बरा होतो असं नाही, पण त्याची तीव्रता कमी होते आणि त्यामुळे किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांचं नुकसान टाळता येतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT