Sudden Weight Gain saam tv
लाईफस्टाईल

Sudden Weight Gain: कमी खाऊनही वजन वेगाने वाढतंय? या ५ गोष्टी असू शकतात कारणीभूत

Hidden Health Reasons You Should Know: अचानक वजन वाढत आहे का? यामागे हार्मोनल बदल, झोपेचा अभाव, तणाव किंवा औषधांचे साइड इफेक्ट्स कारणीभूत असू शकतात. जाणून घ्या वजन वाढण्यामागील खरे कारण.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल आपण चांगली लाईफस्टाईल किंवा हेल्दी खाण्यावर भर देतो. फीट आणि फाईन राहायचं असेल तर वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. मात्र इतकं करून देखील अचानक वजन वाढत असल्याचं बहुतेक जणांना दिसून येतं. हे फक्त जास्त खाण्यामुळे होतं असं नाही, तर शरीरात काही बदल सुरू असल्याचा तो इशारा असू शकतो.

हार्मोनल बदलांचा परिणाम

शरीराचं वजन हे केवळ आहारावर अवलंबून नसून हार्मोन्सवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. विशेषतः महिलांमध्ये थायरॉइड, पीसीओएस किंवा मेनोपॉजच्या काळात हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो. अशावेळी शरीराचा मेटाबॉलिझम मंदावून थायरॉइड योग्य प्रमाणात हार्मोन तयार करत नाही. अशावेळी तुमच्या वजनात वाढ होऊ लागते.

इन्सुलिन रेजिस्टन्स

इन्सुलिन हे शरीरातील साखर उर्जेमध्ये रूपांतरित करण्याचं काम करतं. मात्र इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यास पेशी त्याला योग्य पद्धतीने साथ देत नाही. त्यामुळे शरीरात जास्त साखर साठू लागते आणि ती चरबीच्या स्वरूपात जमा होते. यामुळे मधुमेहासोबत वजन वाढण्याचाही धोका असतो.

वाढत्या वयाचा परिणाम

वयानुसार शरीरात अनेक बदल होऊ लागतात. अशावेळी स्नायूंची ताकद कमी होऊ लागते आणि मेटाबॉलिक रेट कमी होतो. यामुळे शरीर कॅलरीज बर्न शकत नाही. त्यामुळे 30-40 वयानंतर आहारात फारसा बदल न करता देखील वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

झोपेअभावी वाढणारी समस्या

पुरेशी झोप न घेतल्यास किंवा इनसोम्नियाचा त्रास असल्यास भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात आणि पोट भरल्याची जाणीव देणारे हार्मोन्स कमी होतात. यामुळे वारंवार भूक लागते. झोपेअभावी शरीरात तणाव वाढतो आणि कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढून पोटाभोवती फॅट साचू लागतं.

औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे वाढतं वजन

काही वेळा आजारांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळेही वजन वाढू शकतं. अँटी-डिप्रेसंट्स, स्टेरॉइड्स किंवा उच्च रक्तदाबासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या शरीरात पाणी साठवतात किंवा भूक वाढवतात. जर एखादं औषध सुरू केल्यानंतर अचानक वजन वाढत असल्याचं जाणवलं, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील तीन अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

Digital Account: तुमची किती बँक खाती आहेत? एकच खाते असेल तर आताच वाचा ही बातमी

Dombivli : कामासाठी तरूणाला बोलावलं, घराबाहेर पडताच १४ जणांनी केला हल्ला; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

सुनील तटकरेंना बालेकिल्ल्यात जोरदार धक्का; दिवेआगारची सत्ता गेली

Malai Kulfi Recipe: उन्हाळ्यात खा थंडगार मलाई कुल्फी, घरीच ट्राय करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT