अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Ambabai Temple Gets Stunning Gold Kalash: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला एका भक्ताकडून तब्बल कोट्यवधीचा सुवर्ण कळस दान करण्यात आलाय. विशेष म्हणजे, या सुवर्ण कळसामुळे मंदिर प्रशासनाची एक चिंतादेखील दूर होणार आहे. पाहा यावरचा हा रिपोर्ट...
A magnificent 1.5 kg golden kalash installed atop the Ambabai Temple in Kolhapur, donated by former Goa CM Pratapsingh Rane.
A magnificent 1.5 kg golden kalash installed atop the Ambabai Temple in Kolhapur, donated by former Goa CM Pratapsingh Rane.saam tv
Published On

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर आता तब्बल अडीच कोटींचा दीड किलो सोन्याचा देखणा सुवर्णकळस चढवण्यात आलायय हा सोन्याचा कळस गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी अर्पण केलाय. हा कळस कसा बसवण्यात आला ते पाहूयात..

अधिक महिना आणि देवीचा शुक्रवार असा योग साधत हा कळस बसवण्यात आलाय. गुरुवारी रात्री अकरा वाजल्यानंतर कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यासाठी खास 25 कर्मचारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते. 200 किलो तांब्याचा डेरा आणि कळस बनवण्यात आला असून त्यावर दीड किलो सोन्याचा पत्रा बसवलाय. ज्याची किंमत साधारण अडीच कोटी इतकी आहे.

बंगळुरूच्या कारागिरांनी घडवलेला दीड किलो सोन्याचा कळसामुळे मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुललंय. त्यामुळे यापुढे अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दीड किलो सोन्याच्या कळसाचं आकर्षण असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com