PCOD  freepik
लाईफस्टाईल

PCOS Awareness : PCOS ची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळेत उपचार का आवश्यक आहेत जाणून घ्या

Womens Health : सप्टेंबर हा PCOS जागरूकता महिना आहे. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेत उपचार घेतल्यास गंभीर दुष्परिणाम टाळता येतात आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित राहते.

Sakshi Sunil Jadhav

सप्टेंबर महिना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि तणावामुळे महिलांमध्ये PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची समस्या वाढली आहे. तज्ञांच्या मते, हे आजाराचे सुरुवातीचे लक्षण आहे. जे वेळेत ओळखले गेले, तर उपचार प्रभावी ठरतात आणि गंभीर परिणाम टाळता येतात.

PCOS च्या सुरुवातीच्या अवस्थेत महिलांना खालच्या ओटीपोटात वेदना जाणवू शकतात. काही वेळा सूज देखील जाणवते आणि त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होतात. कोणत्याच कामात यश मिळत नाही. मासिक पाळीतील अनियमित किंवा जास्त प्रमाणातील रक्तस्राव हे देखील या सिंड्रोमचे महत्त्वाचे संकेत मानले जातात. वेदनादायक पाळी वारंवार होत असल्यास महिलांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम केवळ प्रजनन आरोग्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकतो. या आजारामुळे काही वेळा सांधेदुखी, पेल्विक भागात वेदना आणि सतत थकवा जाणवू शकतो. दिवसभर थकवा जाणवणे हे अनेक महिलांकडून दुर्लक्षिलं जातं, परंतु ते PCOS चे लक्षण असू शकते.

तज्ञांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यातच ही लक्षणे ओळखून जीवनशैलीत बदल, योग्य आहार आणि वैद्यकीय उपचार सुरू केले तर दीर्घकालीन दुष्परिणाम टाळता येतात. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहून या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे वेळेत निदान केल्यास महिलांना निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT