सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावरती स्वतः च्या रक्ताने मनोज जरांगे-पाटील आणि अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे साकारून मुंबई येथे सुरू असलेल्या जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
पिंपळाच्या पानावर जाळीसारखा जणू मराठा बांधव चिवटपणाने एकजीवाने एकवटला असल्याने पिंपळपानाची चित्र काढण्यासाठी निवड केली. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून तलवार उगारुन मोहीम फत्ते करण्यासाठी निघाले असल्याचे या चित्रात दाखवले आहे. तसे मनोज जरांगे-पाटील आरक्षणाची मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबईला गेले आहेत. म्हणून शिवाजी महाराज आणि मनोज दादाचे चित्र एकाच पानावरती रेखाटले आहे.
पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त करून जगाला शांततेचा संदेश गौतम बुद्धांनी दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाने, निर्धाराने आणि गौतम बुद्धांच्या शांततेच्या संदेशाचे आचरण करीत जरांगे-पाटील हे आंदोलनाचा लढा लढत आहेत. म्हणून पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावरती चित्र रेखाटले असल्याची भावना चित्रकार अशोक जाधव यांनी व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मनस्वी चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी दिल्ली येथे झालेल्या आण्णा हजारे यांच्या आंदोलनाला गांधी टोपी घातलेल्या गणपतीचे काष्ठशिल्प साकारून या कलाकृतीवरती 'मी आण्णा हजारे' लिहून पाठिंबा दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.