Kitchen Hack Saam Tv
लाईफस्टाईल

Kitchen Hack : स्वयंपाकघरातील भांड्यांच्या हँडलमध्ये छिद्र का असतो? जाणून घ्या त्यामागचे कारण

Secret Reason Your Pan Handle Has a Hole : स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्याच्या हँडलला असलेले छिद्र. ते छिद्र का असते?

कोमल दामुद्रे

Why Pan Handles Have a Hole : आपण आपल्या रोजच्या जीवनात अशा अनेक गोष्टी पाहतो आणि वापरत असतो, ज्यांचा खरा अर्थ काय आहे? ते कशासाठी वापरले जाते? यामागची कारणे आपल्याला माहिती नसतात.

स्वयंपाकघरात (Kitchen) वापरल्या जाणाऱ्या भांड्याच्या हँडलला असलेले छिद्र. ते छिद्र का असते ? त्याचा नेमका उपयोग तरी काय? तुम्ही कधी त्या छिद्रांचा वापर केला आहे का? जर नाही तर आम्ही तुम्हाला आज या हँडलला असलेल्या छिद्रामागील काही अप्रतिम कारणे सांगणार आहोत.

1. भांड्याची पकड घट्ट करण्यासाठी

आपल्या आहारात (Food) अनेक प्रकारचे पदार्थ सामिल असतात. काही पदार्थ चिवट, काही पदार्थ पातळ तर काही पदार्थ घट्ट असतात अशा वेळी जेवण बनवताना त्या पदार्थात सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळावे याकरीता पदार्थ एकजीव करण्यासाठी वापरला जाणारा चमचा आणि पदार्थ शिजवण्यासाठी वापरल्या गेलेल्या भांड्याचे हँडल हातातून सारखे सुटू नये या कारणाकरीता हँडलमध्ये छिद्र ठेवलेले असते.

जर का भांड्याचे हँडल एखाद्या पट्टी किंवा बांबूप्रमाणे असेल तर आपल्या हातात ते व्यवस्थित बसू शकणार नाही. आपल्या हाताची बोटे समान नसतात ज्यामुळे छिद्र नसलेले हँडल आपल्या हातात बसणार नाही. हँडलमध्ये असलेल्या छिद्रामध्ये आपल्या हाताची लहान बोटे (करंगळी) हँडल भोवती आपली पकड मजबूत करू शकते. ज्यामुळे स्वयंपाक करताना अडथळे येत नाहीत.

2. भांड्याच्या उष्णतेला कमी करण्यासाठी

पॅनच्या हँडलमध्ये असलेले छिद्र त्याची उष्णता कमी ठेवण्यासाठी दिलेले असतात, जेवण करताना हँडल गरम होऊन हात भाजू नये याकरीता पॅनच्या (Pan) हँडलमध्ये छिद्र दिलेली असतात.

3. खवणी किंवा चमचा अडकण्यासाठी

पॅनमध्ये दिलेले छिद्र खवणी, चमचे अडकवण्यासाठी असतात. जेवण करताना पदार्थ एकजीव करण्यासाठी घेण्यात आलेला चमचा कायम पदार्थ ढवळून झाल्यावर सारखा खाली किंवा बाजूला ठेवावा लागतो यामुळे जेवण बनवताना स्वयंपाकघर घाण होते व पसारा देखील वाढतो. त्यामुळे जर तुम्ही दर आतापर्यंत जेवण बनवताना चमचा दरवेळी खाली ठेवत असाल तर आजपासून तुम्ही त्याला त्या छिद्रामध्ये अडकवून आरामात स्वयंपाक करू शकता. यामुळे तुमचे स्वयंपाकघर देखील स्वच्छ राहिल व त्या छिद्राचा चांगला वापरही होईल.

4. उत्तम स्वच्छतेसाठी

स्वयंपाक घरातील भांड्यांमध्ये छिद्र असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, भांड्यांची स्वच्छता व्यवस्थित व्हावी. पॅनला स्वच्छ करताना तुम्ही हुकला अडकवून तो व्यवस्थित स्वच्छ करु शकता.

5. स्वयंपाकघरातील जागा वाचवण्यासाठी

बऱ्याच घरांमध्ये स्वयंपाकघरातील जागा वाचवण्यासाठी पॅनला हुक्सला अडकवून ठेवतात. जर तुमचे स्वयंपाक घर लहान असेल तर तुम्ही भांड्याची व्यवस्था करताना हँडल असलेल्या भांड्यांना हुकला लावून जागेची बचत करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT