Bike Ride Tips : नजर हटी दुर्घटना घटी ! पावसाळ्यात बाईक चालवताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा...

Safety Tips For Riding : ऑफिसला किंवा कामाच्या निमित्ताने आपण रस्त्यावर टू-व्हिलरचा वापर करतो.
Bike Ride Tips
Bike Ride TipsSaam tv
Published On

Monsoon Riding Tips : पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेकदा प्रवास करताना आपण बाईकचा वापर करतो. ऑफिसला किंवा कामाच्या निमित्ताने आपण रस्त्यावर टू-व्हिलरचा वापर करतो. पावसाळा म्हटलं की, आपल्याला आरोग्याची काळजी घेणे देखील अधिक महत्त्वाचे आहे.

बरेचदा या ऋतूमध्ये बाईक (Bike) घेऊन अनेकांना निसर्गाचा गारवा अनुभवायचा असतो. परंतु, यावेळी आपण बाईक चालवताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास होणाऱ्या अपघातापासून आपले संरक्षण करु शकता. एक चुक आपल्या महागात पडू शकते. त्यासाठी बाईक चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी हे जाणून घेऊया

Bike Ride Tips
Monsoon Car Tips : पावसाळ्यात अचानक तुमची बाईक-कार अडकली तर, कशी वाचवाल ? जाणून घ्या या खास टिप्स

1. हेल्मेट

बाईक चालवताना हेल्मेट घालणे अधिक गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा हेल्मेट घालूनच बाहेर निघा. अपघाताच्या वेळी हेल्मेटमुळे आपला जीव वाचण्यास मदत होते. हेल्मेटच्या काचेमुळे पावसाळ्यात पाण्याचे थेंब डोळ्यांवर पडत नाहीत, त्यामुळे दुचाकी चालवणे सोपे होते.

2. समोरील वाहनाचा पाठलाग करा

पावसात (Monsoon) बाईक चालवत असताना तुम्ही समोरून धावणाऱ्या कारचा पाठलाग करू शकता किंवा ऑटोच्या मदतीने बाईक ठराविक अंतरावर ठेवू शकता. यामुळे तुम्हाला कळेल की रस्त्यावर खड्डा कुठे आहे ते त्यामुळे तुमचा अपघात होण्यापासून तुम्ही वाचू शकता.

Bike Ride Tips
Monsoon Trek : पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा प्लान करताय? महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे ठरतील बेस्ट!

3. पाणी साचलेल्या रस्त्यावरुन जाऊ नका

अनेक वेळा लोक चुकून पाणी साचलेल्या रस्त्यावरून जातात. असे केल्याने दुचाकी खड्ड्यात अडकण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच पावसाळ्यात ओळखीच्या वाटेने जा.

4. बाईक निसरड्या भागातून बाहेर काढा

तुम्हाला वाटेल की पुढचा रस्ता जास्त सपाट किंवा मोकळा आहे, तिथून बाईक काढताना हँडल सरळ ठेवा आणि बाईक सरळ दिशेने न्या. तसेच अशा वेळी रस्त्यावर दुचाकीचा वेगही कमी ठेवा.

5. ब्रेक

पावसाळ्यात अचानक ब्रेक लावणे टाळा. अचानक ब्रेक लावणे आवश्यक असल्यास, दोन्ही ब्रेक एकत्र वापरा. तसेच मागील ब्रेक वापरण्याचा प्रयत्न करा. आवश्यक असल्यासच मागील ब्रेकसह पुढील ब्रेक वापरा. यासोबतच वळणावर ब्रेक न लावण्याची विशेष काळजी घ्या.

Bike Ride Tips
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

6. समोरील वाहनापासून योग्य अंतर ठेवा

पावसात दुचाकी चालवताना इतर वाहनांपासून योग्य अंतर ठेवा. समोरून धावणाऱ्या बाईक लागून दुचाकी चालवल्यास समोरच्या रस्त्यावर खड्डे वगैरे दिसणार नाहीत. यासोबतच डावीकडे इंडिकेटर असतानाही तुम्ही बाईक हाताळू शकणार नाही आणि तुम्ही अपघातालाही बळी पडू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com