Breast cancer symptoms in young women saam tv
लाईफस्टाईल

World Cancer Day: तरुणींमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय? लक्षणं कशी ओळखावी, तज्ज्ञांनी दिली माहिती

Breast cancer symptoms in young women: ग्लोबोकॅन 2022 नुसार, भारतात दरवर्षी या आजाराचे सुमारे 1.9 लाख नवीन प्रकरणं आणि 98 हजार मृत्यू होतात. स्तनाच्या कर्करोगाचा धोका असलेल्या महिलांनी त्यांच्या स्क्रीनिंगबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार केला पाहिजे.

Surabhi Jayashree Jagdish

जगभरात स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वात जास्त निदान होणारा कर्करोग आहे आणि महिलांमध्ये कर्करोगामुळे मृत्यूचं एक कारण आहे. ग्लोबोकॅन 2022 नुसार, भारतात दरवर्षी या आजाराचे सुमारे 1.9 लाख नवीन प्रकरणं आणि 98 हजार मृत्यू होतात. स्तनाच्या कर्करोगाचा धोका असलेल्या महिलांनी त्यांच्या स्क्रीनिंगबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार केला पाहिजे.

नाशिकमधील Cancer Centers of America च्या डॉक्टर श्रुती काटे म्हणाल्या की, 40 वर्षांखालील भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये 25% प्रकरणं असल्याचं ताज्या आकडेवारीवरून दिसून आलंय. ज्यामुळे आरोग्य सेवा व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. स्तनाच्या कॅन्सरच्या जोखमीच्या घटकांची संख्या लक्षणीय आहे. यात बदलण्यायोग्य घटक आणि अपरिवर्तनीय घटक दोन्ही समाविष्ट आहेत.

कमी वयात कॅन्सर होण्याची कारणं

डॉ. श्रुती यांनी सांगितलं की, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, मासिक पाळीचे कमी वय, रजोनिवृत्तीचं उशिरा वय, पहिल्या पूर्ण मुदतीच्या गर्भधारणेचं उशीरा वय, पोस्टमेनोपॉझल लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अनुवांशिक प्रवृत्ती ही या कॅन्सरचं निदान कमी वयात होण्याची काही कारणं आहेत. एकदा रूग्ण डॉक्टरांकडे गेला की, निदान, शस्त्रक्रिया आणि उपचार आणि वेळेत प्रवेश मिळणं गरजेचं आहे.

सामान्यपणे वृद्ध स्त्रियांना (50 वर्षांवरील) कॅन्सर होतो असा समज आहे. स्तनाचा कॅन्सर आता तरुण लोकसंख्येत (40 वर्षांपेक्षा कमी) मोठ्या प्रमाणात निदान केला जातो. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी वयात अधिक असल्याचे सध्याच्या ट्रेंडवरून दिसून येत आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या निदानाचे सरासरी वय ५२ आहे, असं डॉ. श्रुती यांनी सांगितलं आहे.

भारतात स्तनाच्या कर्करोगाचे ६० टक्के रुग्ण प्रगत अवस्थेत असल्याने पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याने लवकर निदान होणं महत्त्वाचं आहे. लवकर निदानासाठी नियमित तपासणीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढतेय. ज्यामुळे तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग शोधण्याचं प्रमाण वाढतं.

जोखीम कमी करण्याविषयी जागरूकता, हेल्थकेअर व्यावसायिक वयाच्या 20 व्या वर्षापासून मासिक स्तन स्व-तपासणी, वयाच्या 30 व्या वर्षापासून क्लिनिकल स्तन तपासणी आणि वयाच्या 40 व्या वर्षापासून वार्षिक मेमोग्रामची सल्ला देण्यात येतो. सुरुवातीच्या टप्प्यात स्तनाचा कर्करोग शोधल्यास पुढील आय़ुष्य सुकर होण्यास मदत होईल.

फळं आणि भाज्या समृद्ध संतुलित आहाराचा अवलंब करणं, नियमित शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतणं, अल्कोहोलचं सेवन कमी करणं आणि तंबाखू खाणं टाळणं देखील प्रतिबंधात्मक भूमिका बजावू शकतं. कॅन्सर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणं गरजेचं आहे. कॅन्सरचं व्यवस्थापन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सुरुवातीची लक्षणं समजून घेणं आणि वेळेवर उपचार सुरू करणं, असं डॉ. श्रुती म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT