Winter lethargy SAAM TV
लाईफस्टाईल

Winter lethargy: थंडीच्या दिवसात सकाळी उठताना शरीर साथ का देत नाही? सुस्ती नाही तर डॉक्टरांनी सांगितली ६ कारणं

Winter morning wake up difficulty: हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी उठणे अनेकांना कठीण जाते. फक्त आळसच नाही तर वैद्यकीय कारणांमुळेही शरीर उठण्यास विरोध करते. डॉक्टरांनी यामागील सहा प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

थंडीचे दिवस म्हटलं की सगळेच जण सकाळी उठण्याचा कंटाळा करतात. मस्त थंड वातावरणात चादर टाकून उठण्याचा विचारानेही आपल्याला नकोसं होतं. अशावेळी आपण स्वतःला आळशी समजून मोकळे होते. मात्र खरी गोष्ट एकमद वेळगी आहे. या आळसामागे फक्त तुमचं मनच नाही तर तुमच्या शरीराचे संपूर्ण विज्ञान आहे.

थंड तापमान आणि हलकं ऊन या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या शरीरात असे काही बदल होतात जे उठण्याच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये अडथळा आणतात. थंडीच्या दिवसातील सकाळ आपल्या इच्छाशक्तीवर का परिणाम करते आणि त्यामागील खरं कारण काय याची माहिती सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसीनच्या डॉ. मनीषा अरोरा यांनी लाईव्ह हिंदुस्तान या वेबसाईटला दिलीये.

सर्केडियन रिदममध्ये बदल

डॉ. मनीषा अरोरा यांनी सांगितलं की, हिवाळ्यात लवकर न उठण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव. सूर्यप्रकाश आपल्या शरीराच्या सर्कॅडियन रिदमला नियंत्रित करतं. हे आपल्या झोपेचा आणि जाग येण्याचा वेळ ठरवत असतं. हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि सूर्य उशिरा उगवतो. ज्यामुळे शरीराला सकाळी पुरेसा प्रकाश मिळत नाही. याचा मेंदूवर परिणाम होतो आणि शरीराला वाटतं की अजूनही रात्र आहे. म्हणून आपल्याला उठायला कंटाळा येतो.

मेलाटोनिन पातळी वाढणं

हिवाळ्यात लवकर न उठण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे शरीरात मेलाटोनिन या हार्मोनचं अधिक स्रवण होतं. हे हार्मोन अंधारात जास्त तयार होतं आणि झोप येण्यास मदत करतं.

शरीराचं तापमान आणि थर्मोरेग्युलेशन

थंड हवामान देखील झोप येण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. थंडीत, शरीर मंदावतं आणि ऊर्जा वाचवण्यासाठी आराम करण्यास प्राधान्य देतं. उबदार ब्लँकेटमध्ये शांत झोपणं आणि बाहेर थंडी यामुळे अंथरुणातून बाहेर पडण्यात आळस येऊ शकतो. थंडीमुळे रक्तप्रवाहात काहीशी घट होऊन आळस आणि थकवा येतो.

सेरोटोनीनवर परिणाम

हिवाळ्यात मूड आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करतो. कमी सूर्यप्रकाशामुळे "फील-गुड" केमिकल सेरोटोनिन कमी होऊ शकतं. ज्यामुळे दुःख, थकवा आणि अधिक झोपण्याची इच्छा निर्माण होते.

व्हिटॅमीन डीची कमतरता

हिवाळ्यात लोकांना कमी सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा येतो. ज्यामुळे सकाळी उठणं कठीण होतं.

लाईफस्टाईल

आपली जीवनशैलीचाही यामध्ये मोठा हात असतो. हिवाळ्यात लोक कमी व्यायाम करतात, ज्यामुळे दिवसा कमी ऊर्जा खर्च होते आणि झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो. जास्त जेवण, जास्त कार्बोहायड्रेट सेवन आणि अनियमित झोपण्याच्या वेळा यामुळे देखील झोपेवर परिणाम होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: डोक्यात ३ गोळ्या झाडल्या, नंतर गळा चिरला; बांगलादेशमध्ये हिंदू पत्रकाराची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : नाशिकचे दोन माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Dal Benefits: कोणत्या आजारात कोणत्या डाळी ठरतील योग्य? न्यूट्रिशनिस्टनी सगळ्या शंका केल्या दूर

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू; पण पगार कधीपासून वाढणार? वाचा सविस्तर

Choclate Tea Recipe: आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय? मग हे 3 कॅफेस्टाईल चहा नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT