Heart blockage symptoms: फक्त छातीतील वेदना नाही तर हे ५ बदल देतात हार्ट ब्लॉकेजचे संकेत; तुम्ही इग्नोर करत नाही ना?

Early signs of heart blockage: हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. छातीत दुखणे हे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते, पण डॉक्टरांच्या मते हृदय ब्लॉकेजची इतरही काही महत्त्वाची चिन्हे आहेत.
Early symptoms of Heart blockage
Early symptoms of Heart blockagesaam tv
Published On

आपल्या शरीरातील प्रत्येक भागात रक्त पुरवठा करण्याचं काम हृदय करतं. हृदय रक्त पंप करून शरीरातील प्रत्येक अवयावाला रक्तपुरवठा करतं. यासाठी दर सेकंदाला हृदयाला काम करावं लागतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा रोखणं हे घातक ठरू शकतं. वैद्यकीय भाषेत याला कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट ब्लॉकेज म्हणतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही स्थिती अचानक उद्भवत नाही आणि ती होण्यापूर्वी शरीर अनेक सिग्नल देतं. ही लक्षणं काय असतात ते जाणून घेऊया. जेणेकरून समस्या असल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील.

छातीत वेदना होणं

हार्ट ब्लॉकेजचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत वेदना होणं. जर तुम्हाला छातीत घट्टपणा, जळजळ जाणवत असेल तर ते एनजाइनाचं लक्षण असू शकतं. थोडा आराम केल्यानंतर ही समस्या दूर होते.

Early symptoms of Heart blockage
Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

श्वास घेण्यास त्रास होणं

जर तुम्हाला थोडं पायी चालल्यानंतर किंवा पायऱ्या चढल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर याचा अर्थ तुमच्या हृदयाला पुरेश्या प्रमाणात रक्तपुरवठा होत नसल्याचं लक्षण आहे. जर असं झालं तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्य आहे.

छोट्या कामाने थकवा येणं

जर तुम्हाला साधी दैनंदिन कामं करूनही सतत थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमच्या हृदयाला पुरशा प्रमाणत रक्तपुरवठा होत नाहीये. हे देखील हार्ट ब्लॉकेजचं एक प्रमुख लक्षण असू शकतं.

हात, मान यांच्यात वेदना होणं

हृदयाच्या समस्यांची लक्षणं ही प्रत्येकवेळी छातीत दिसून येतील असं नाही. या वेदना शरीराच्या इतर भागातही जाणवतात. जसं की डाव्या हातातील, पाठ किंवा जबड्यात वेदना होणं. लोक अनेकदा या वेदनांकडे दुर्लक्ष करतात.

Early symptoms of Heart blockage
Reasons Behind Team India Defeat: कुठे गमावली टीम इंडियाने मॅच? वाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवाची प्रमुख कारणं..

हृदयाची गती अनियमित होणं

जर तुमच्या हृदयाचे ठोके अचानक वेगाने जाणवत असतील तर सावध व्हा. कारण हे ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. यासोबत जर व्यक्तीला चक्कर येण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे धाव घ्यावी.

Early symptoms of Heart blockage
Heart attack: भारतातील जवळपास 90 टक्के हार्ट अटॅकमागे लपलीयेत ही ४ कारणं; वेळीच धोका ओळखून करा उपाय

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com